देशातील पहिली लांब पल्ल्याची CNG बस सेवा सुरू

पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी देशातील पहिला सर्वात लांबचा प्रवास करणारी CNG बस सेवेची सुरूवात केली.

 बस सेवेसाठी महिंद्रा अँन्ड महिंद्रा आणि अमेरिकेच्या एगिलिटी सोल्युशनमध्ये करार झाला आहे. महिंद्रा कंपनीची ही सीएनजी बस दिल्ली ते देहरादून या मार्गावर धावेल.

 उत्तराखंडने या सेवेसाठी आयजीएलसोबत करार केला आहे. या अंतर्गत पहिल्या टप्प्यात 5 सीएनजी बस चालवल्या जातील. त्यानंतर यांच्या संख्येत वाढ केली जाईल.
 *बसचे वैशिष्ट्ये*
▪ एकदा रिफिल केल्यानंतर ही बस 1000 किमीपेक्षा अधिक अंतर पार करू शकेल.
▪ बसमध्ये कंपोजिट इंजिनचा वापर करण्यात आलेला आहे.
▪ याचे वजन सध्याच्या CNG सिलेंडरच्या तुलनेत जवळपास 70 टक्के कमी आहे.
▪ नवीन सिलेंडरमध्ये 225 ते 275 किलोग्राम CNG भरता येतो.
▪ सध्याच्या CNG बसच्या सिलेंडरमध्ये 80 ते 100 किलोग्राम सीएनजी भरता येतो.

सीएनजी बसमुळे प्रदुषण देखील कमी होईल व इंधनावर होणारा खर्च देखील वाचेल.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment