यु-टर्नला उद्धवजी टर्न म्हटले पाहिजे : चंद्रकांत पाटील


                          
सरकारने शेतकऱ्यांना दिलेली 2 लाखांची कर्जमाफी स्वागतार्ह आहे. मात्र ही शुद्ध फसवणूक असल्याची टीका भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळला नाही. त्यांनी दिलेल्या शब्दावरुन यु-टर्न मारल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
उद्धव ठाकरे यांनी यु-टर्न मारला आहे. यु-टर्नला आता उद्धवजी टर्नम्हटले आहे. ते प्रत्येक गोष्टीत यु-टर्न मारतात. त्यांनी सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सरकारने 2 लाखाची कर्जमाफी केली आहे. 

 दरम्यान 2001 ते 2016 या कालावधीतील 2 लाखापर्यंतचे कर्ज असलेला शेतकरी कर्जमाफी देण्यासाठी राहिला नाही. 

आता फक्त 2 लाखावरचे शेतकरी राहिले असून त्यांना कर्जमाफी दिली जाणार नाही. त्यामुळे ही कर्जमाफी म्हणजे फसवणूक आहे, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.


About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment