‘मी नसतो, तर चीनच्या सैनिकांनी १४ मिनिटात हाँगकाँगला नष्ट केलं असतं’: राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन : ‘मी नसतो, तर चीनच्या सैनिकांनी १४ मिनिटात हाँगकाँगला नष्ट केलं असतं’, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. 'फॉक्स न्यूज'ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. ‘माझ्या सांगण्यावरुनच चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी लोकशाहीची मागणी करणाऱ्या आंदोलकांविरोधात सैन्य पाठवलं नाही’, असा दावाही ट्रम्प यांनी या मुलाखतीत केला.

‘मी मध्यस्थी केली नसती तर १४ मिनिटात हाँगकाँगचं अस्तित्व नष्ट झालं असतं’, असंही ट्रम्प म्हणाले. ‘शी जिनपिंग यांनी हाँगकाँगच्या बाहेर लाखो सैनिक तैनात केले होते. ते आत जाऊ शकले नाही, कारण त्यांनी कारवाई करू नये, असं मी चीनच्या राष्ट्रपतींना सांगितलं होतं. कारवाई केल्यास ही मोठी चूक असेल. यामुळे द्वीपक्षीय व्यापारावर नकारात्मक प्रभाव होईल, असं चीनला सूचित केलं होतं’, असा दावा नकारात्मक प्रभाव होईल, असं चीनला सूचित केलं होतं’, असा दावा ट्रम्प यांनी केला.


हाँगकाँग आंदोलनावरुन अनेकदा अमेरिका आणि चीन यांच्यात शाब्दिक युद्ध पाहायला मिळालं. हाँगकाँग आंदोलन हा चीनचा अंतर्गत मुद्दा आहे. यात अमेरिकेने हस्तक्षेप करू नये, असं नुकतंच चीनने बजावलं होतं. कारण, अमेरिकन सीनेटमध्ये नुकतंच लोकशाही समर्थक आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी विधेयक सादर करण्यात आलं होतं.
सीनेटमध्ये आणलेलं विधेयक तातडीने रोखलं जावं, अशी मागणी चीनच्या उप परराष्ट्र मंत्र्यांनी केली होती. हे विधेयक कायदा बनण्याच्या आत रोखलं नाही तर यावर कारवाई केली जाईल, असा इशाराही चीनने दिला होता. हाँगकाँगच्या आंदोलकांनी मोठ्या हिंसाचारानंतरही मागणी कायम ठेवली. या आंदोलकांनी अनेकदा डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे मदतही मागितली होती.

हाँगकाँगमधील हिंसक आंदोलनामुळे हजारो लोक जखमी आहेत. या आंदोलकांच्या उपचारासाठी मदतही दिली जात आहे. नुकतंच हाँगकाँगमध्ये पुन्हा आंदोलक आणि पोलिसांमध्ये चकमकीच्या घटना घडल्या होत्या. हाँगकाँगमध्ये लोकशाही प्रस्थापित व्हावी यासाठी आंदोलकांनी अमेरिकेचीही मदत मागितली होती.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment