ह्या वर्षी कापूस या पिकाची फरदड घ्यायची किंवा नाही..

 नमस्कार मित्रांनो,

ह्या वर्षी कापूस या पिकाची फरदड घ्यायची किंवा नाही, या संदर्भाचे अनेक शेतकरी प्रश्न विचारत आहेत, त्यासाठी शेतकरी बंधूंना सविस्तर सल्ला आणि मार्गदर्शनाची आवश्यकता लक्षात घेऊन हा लेख प्रपंच.

शेतकरी बंधुनो आपण 2002 पूर्वी नॉन बीटी कापूस लागवड करायचो, तेव्हा अनेक शेतकरी कापूस पिकाची फरदड घेत होते, आणि खूप खर्च न करता उत्पन्नही एका एकरला 7/8 क्विंटल येत होते,मी माझ्या   गावात एप्रिल  एन्ड पर्यंत शेतकरी फरदडीचा कापूस वेचताना पाहिलेले आहे.त्यावेळेस नॉन बीटी कापूस होता ,जुलै ते ऑक्टोबर या काळात कापसावर फार मोठ्या प्रमाणात अळी चा अटॅक असायचा, शेतकऱ्यांना 8/10 वेळा कीटकनाशकांची फवारणी करावी लागत होती,पण नोव्हेम्बर महिन्यात थंडीला सुरुवात झाली की अळीची अंडी अतिथंडीमुळे उबळत नव्हती,दुसरे 2002 पूर्वी सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता होती 3/4 वेळा शेतकरी पाट पाणी देत होते, सर्व शिवार ओलेचिंब असायचे त्यामुळे थंडीत अजून भर पडायची आणि अशा कडाक्याच्या थंडीत अळी चा टिकाव लागत नव्हता, त्यामुळे फरदडीचे पीकही हमखास येत होते.


2002 नंतर बीटी वाण बाजारात  आल्यानंतर 2/3 वेळा रसशोषक कीटक नाशकांची फवारणी केली की एकरी 12/14 क्विंटल उत्पन्न मिळू लागले कारण कापूस पिकावर अळी लागवडीपासून 90 दिवस पडतच  नव्हती ,आणि अळीरोधक जीन्स ची प्रतिकार क्षमताही चांगली होती ,त्यामुळे कापसाचे उत्पन्न 2012 पर्यंतभरपूर मिळत गेले. 2002 ते 2012 या काळातच महाराष्ट्रातील प्रत्येक खेड्यात सिमेंट काँक्रीटच्या घरांची बांधणीमोठ्या प्रमाणावर  झाली कारण कापूस उत्पादनात वाढ झाल्यामुळे शेतकाऱ्यांच्या हातात पैसा खेळता राहिला,व आर्थिक उन्नती झाली.पण जर 2012 सालापासून बीटी कापसाच्या उत्पन्नाचे अवलोकन केले तर 2012 पासून बीटी कापसाचे उत्पन्न दर वर्षी घटत चालल्याचे आपल्या निदर्शनास येईल. त्याच्या कारणांचा विचारच कोणी करत नाही. कापसाचे बीटी वाण जरशी गायी सारखे खादाड  आहे ,जितके संतुलित अन्न द्रव्ये त्याला पुरवली तितके उत्पन्न देते.

गेल्या दोन/तीन दशकापासून शेतकरी वर्षातून दोन/दोन तीन/तीन पिके घेऊ लागला ,रासायनिक खतांच्या अतिरेकी वापरामुळे जमिनीचा कस गेला ,जमिनीतील जैविक/सजीवश्रुष्टी नाहीशी होत गेली ,सेंद्रिय कर्बाचे प्रमाण  0.2 पर्यंत खाली आले जमीन निकृस्ट होत गेली ,नापीक होत चाललीय ,आपल्याला जमिनीतून जे उत्पन्न मिळते ते फक्त आणि फक्त सेंद्रिय कर्ब आणि  जीवणूमुळेच मिळते हे शेतकरी विसरत गेला, बऱ्याच शेतकऱ्यांच्या लक्षात हि बाब आल्यामुळे  अनेक शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळत आहेत.

मित्रानो,
पिकांची प्रतिकार क्षमता/ताकद वाढवण्या साठी सर्वप्रथम जमिनीच्या आरोग्य व्यवस्थापणाकडे लक्ष देणे पण तितकेच गरजेचे आहे.एकदा का जमिन ताकदवर, जिवंत व कसदार झाली की पिकांची प्रतिकार शक्तीवाढते,  उत्पादन खर्च कमी होवून एकंदरीत उत्पादन-उत्पन्न यांत नक्कीच वाढ होते.
मित्रानो सुपीकता  कमी होण्याची अनेक कारणे आहेत,जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी होत आहे,जमिनीतील सामु मध्यम ते जास्त विम्लतेकडे वाढत चालला आहे,सखोल पिक पद्धतींचा वापर, अन्नद्रव्यांचा असमतोल वापर,

 सिंचनाचा अमर्याद वापर ,
रासायनिक खते देण्याची चुकीची पद्धत, (वेळ आणि मात्रा).जमिनीचे बिघडत चाललेले भौतिक गुणधर्म आणि कमी होत चाललेली सूक्ष्मजिवाणुची संख्या.या सर्व कारणांमुळे शेतजमिनीची उत्पादकता उत्तरोत्तर कमी कमी होत आहे.

पीक कोणतेही असो त्याला सर्व प्रकारच्या अन्न घटकांचा पुरवठा केला तरच चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा धरावी,

मित्रानो वरील विवेचन करण्याचे कारण असे की शेतकरी बंधू कापूस या मुख्य पिकाचे उत्पन्न घेताना काळजी घेतो तितकी काळजी फरदड या पिकाची घेत नाही.

गेल्या 2/3 वर्षांपासून सेंद्री अळी मुळे कापूस पिकाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे,या वर्षी सुद्धा प्रिमान्सूनच्या कापसावर सेंद्री अळीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे ,प्रि मान्सूनच्या कापसात आजही 30 ते 40% कैरीत सेंद्री अळीने नुकसान केले आहे,दहा पैकी 4 कैरी किडकी आहे  हे शेतकऱ्यांच्या लक्षातच आले नाही.

फरदड घ्यावी कि नाही
दोन वर्षांपूर्वी सेंद्री अळी मूळे कापुस पिकाचे फार मोठ्याप्रमाणात नुकसान झाले होते, आणि त्यासाठीच आपल्या राज्यात कापूस बियाणे विक्रीस 15 मे व नंतर दुसऱ्या वर्षी 1 जून नंतरच परवानगी मिळाली.कारण लवकर किंवा प्रिमान्सून लागवड केल्यास सेंद्री अळी मोठ्या प्रमाणात येते तिचे पुरुत्पादन कमी व्हावे म्हणून सरकारनेच कापसाची लागवड 1 जून नंतरच करावी असे बंधन घातले ,त्याचा थोडाफार उपयोग झाला, ह्यावर्षी सेंद्री अळी चे प्रमाण सुरुवातीस नगण्य राहिले, त्यामुळे शेतकऱ्यांनी कापसावर सेंद्री अळी नाही असे समजून  10 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या काळात फवारणी कडे दुर्लक्ष केले,त्याचा परिणाम आज उभ्या कापसात दिसत आहे.शेतकरी बंधुनो सेंद्री अळी चे सायकल ब्रेक व्हावे म्हणून फरदड घेऊच नका ,असे माझे मत आहे, फरदड घेतली नाही तर सेंद्री अळीचे सायकल निश्चित ब्रेक होते हे मागच्या वर्षी फरदड न घेतल्यामुळे सर्वशेतकऱ्यांच्या लक्षात आले.पण ह्या वर्षी उशिरा पेरणी आणि अति म्हणजे नागदीपवाळी पर्यंत पडणाऱ्या पावसामुळे कापूस हंगाम 1 ते दीड महिना लांबला ,रब्बी पेरणीची मुदत संपत आली आणि रब्बी साठी अजून जमिनी तयार नाहीत ,त्यामुळे शेतकऱ्यांचा कल कापूस पिकाची फरदड घेण्याकडे दिसत आहे.मी वर सांगितल्या प्रमाणे सेंद्री अळी चे सायकल ब्रेक होण्यासाठी फरदड घेऊ नका पण ह्या वर्षी लांबलेल्या पावसामुळे 10 ते 15% शेतकरी फरदडीचे नियोजन करतील असे वाटते. फरदड घेऊच नका पण काही इलाजच नसेल तर नियोजन व्यवस्थित करा.शेतकरी 1/2 वेळा  युरिया खत म्हणून देतात आणि एखादी फवारणी करतात आणि उत्पन्नाची अपेक्षा ठेवतात ते चुकीचे आहे.ज्या शेतकऱ्यांना फरदड ठेवायची असेल ,त्यांनी खालील प्रमाणे फरदडीचे नियोजन करावे

फरदड खत,फवारणी, आणि पाणी नियोजन
फरदड घ्यायची असल्यास ज्यांना फरदड घ्यायची आहे त्यांचा कापूस हिरवा असला पाहिजे, खूप लाल पडलेला ,पिवळा झालेला,दह्याचे प्रमाण अधिक असलेल्या कापसाची फरदड घेऊ नका. कापूस पिकाची 60% वेचणी झाल्या नंतर अर्धी बॅग डीएपी अर्धी बॅग पालाश आणि 1 बॅग युरिया अशी खताची मात्रा देऊन एकाआड एक सरी पाणी द्यावे,त्यानंतर रब्बीची तंणे मोठ्या प्रमाणात उगवतात त्याची निदनी करून घ्यावी,किंवा एखादा फेर मारावा. 1 ल्या पाण्या नंतर 20/25 दिवसानीच दुसरे पाणी द्यावे, शक्य झाल्यास अर्धी बॅग युरिया आणि अर्धी बॅग अमोनियम सल्फेट देऊन दुसरे पाणी एकाआड एक सरी या पद्धतीनेच द्यावे.दोन पाणी दिल्यानंतर फरदडीला लागलीच पाणी देण्याची आवश्यकता नाही, कारण थंडी मुळे दव/वस मोठ्या प्रमाणात पडत असल्यामुळे पिकाची पाण्याची गरज भागते ,फरदडिला 25 जानेवारी नंतर एकसरिआड एक अशा पद्धतीने शेवटचे पाणी द्यावे.

पिकसौंरक्षण
कापूस पिकाच्या शेवटच्या वेचणी नंतर रस शोषण करणाऱ्या किडी आणि अळी साठी 10/12 दिवसाच्या अंतराने कमीत कमी 3 वेळा फवारणी आवश्यक आहे.फवारणीत सिंथेटिक पायरेथ्रीड औषधांचा अजिबात वापर  करू नये,त्यामुळे  पांढऱ्या माशीचे प्रमाण वाढते ,चिकटा पडण्याची शक्यता असते.

फवारणी
  1.  इमामेकटींन 10 ग्रॅम
      असिटामा प्राईड 20 ग्रॅम साफ 35 ग्रॅम
      स्प्रेडर 5 मिली 
   
     2. टकाफ 25 मिली
      रोको 30 ग्रॅम

       स्प्रेडर 5 मिली

    3. कोराजन 5 मिली
        लांसर गोल्ड 30 ग्रॅम
        बावीस्टीन 30 ग्रॅम
        स्प्रेडर 5 मिली.

अशा पद्धतीने 3 वेळा फवारण्या कराव्यात,मात्र प्रत्येक फवारणीत अळी नाशक ,बुरशीनाशक आणि रसशोषक किडी नाशक घ्यावे, प्रत्येक फवारणीत विद्राव्य खत घेऊ शकतात.
      वर सांगितलेल्या पद्धतीने फरदडीचे योग्य नियोजन केल्यास चांगले उत्पन्न येऊ शकेल.

                                                                                             धन्यवाद.

About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment