नुकतीच वाचनात आलेली एक सुंदर रचना...

💗 अग थांब न जराशी                           
टेक जरा सोफ्यावर...
मागे वळून बघ
संपली की ग चाळीशी।

डबे भरा, दप्तर भरा, 

पाळणाघरात सोडा, 
पेरेंट्स मीटिंग अटेंड करा,
टुशन्स ला पोचवा...
संपले आता सारे
मुले मार्गी लागतायत
विसावा घे, टेक जराशी
अग, संपली की ग चाळीशी।

राहिलेले छंद, उरलेली पुस्तके

काढ दीवाणा मधून बाहेर
किती धूळ जमा झालीय बघ...
झटक ना ग जराशी
संपली की ग चाळीशी।

जबाबदाऱ्या कुणाला 

चुकल्यात का?
पण प्रत्येकाच्या मागणीला 
आता पडू नको पुरेशी
संपली की ग चाळीशी।

ब्लडप्रेशर, कोलेस्ट्रॉल, 

संधिवात, डायबिटीज्...💕💗
सगळे नवे पाहुणे
येऊ लागलेत दाराशी
संपली की ग चाळीशी।

सांग दणकून मोठयाने

आज मी बाहेर जाणार आहे
तुमचे तुम्ही बघा..
आरशात बघ 
नट्टापट्टा कर
साडी नेस एखादी छानशी
संपली की ग चाळीशी।

नको उतरु जीने धड़ा धड़

चालत नको जाऊ
ऐटीत बोलाव टैक्सी
संपली की ग चाळीशी।💗
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment