उद्योजक करीम हुंडेकरी यांचे राहत्या घराजवळून अपहरण

अहमदनगर: उद्योजक करीम हुंडेकरी यांचं राहत्या घराजवळून पहाटेच्या सुमारास अपहरण करण्यात आल्याची घटना घडली आहे. चार ते पाच अज्ञात व्यक्तींनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत त्यांना एका गाडीत बसवून पळवून नेले. 
हुंडेकरी पहाटे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेले असताना त्यांच्या पाळतीवर असलेल्या चार ते पाच जणांच्या टोळक्याने रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून त्यांना पकडले. त्यानंतर एका गाडीत घालून पळवून नेले. हुंडेकरी यांनी त्यांच्या तावडीतून सुटका करण्याचा प्रयत्न केला, मात्र, त्यात त्यांना यश आलं नाही. 

अपहरणकर्ते गाडीतून खाली उतरले तेव्हा त्यांच्या तोंडावर काळ्या रंगाचे मास्क असल्याचं, प्रत्यक्षदर्शी स्थानिक महिलांचे म्हणणे आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांना एका संशयिताची माहिती मिळाली असून हुंडेकरी यांचा शोध सुरू आहे. ही घटना काही महिलांनी पाहिली आहे. त्यानुसार पोलिस चौकशी करत आहे. हुंडेकरी यांचा कोणाशी वाद होता का किंवा कोणावर संशय आहे का? याबाबत हुंडेकरी कुटुंबाकडे पोलिस अधिक चौकशी करत आहेत. 
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment