हिंसक आणि गुन्हेगारी कृतीत सहभागी होण्यासाठी आमचा तिरंगा वापरू नका. - शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी
अमेरिकेत काल(दि.७) अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी वॉशिंग्टनमधील कॅपिटॉल इमारतीत घुसून जोरदार गोंधळ घातला. ट्रम्प समर्थक हजारोंच्या संख्येने इमारतीबाहेर जमा झाले होते. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. यात चार आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला. पण या सर्व घटनाक्रमामध्ये आंदोलकांपैकी एकाच्या हातात चक्क भारताचा तिरंगा झेंडा दिसत असल्याचा व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला. त्यावरुन आता शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी चांगल्याच संतापल्यात.

आंदोलकांपैकी एकाच्या हातात तिरंगा दिसल्यानंतर, “जो कोणी भारतीय झेंडा फडकवतोय त्याला लाज वाटली पाहिजे. दुसर्‍या देशात सुरू असलेल्या हिंसक आणि गुन्हेगारी कृतीत सहभागी होण्यासाठी आमचा तिरंगा वापरू नका”, अशा शब्दात प्रियंका चतुर्वेदी यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. ट्विटरवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. याशिवाय भाजपाचे खासदार वरुण गांधी यांनीही या घटनेवर सवाल उपस्थित केलेत.

वरुण गांधी यांनी ट्विटरद्वारे, तिथे भारताचा झेंडा का आहे? असा सवाल विचारलाय. ही एक अशी लढाई आहे ज्यामध्ये आपण सहभागी होण्याची नक्कीच आवश्यकता नाहीये असंही गांधी म्हणाले.

दरम्यान, अमेरिकी काँग्रेसने डेमोक्रॅटिक उमेदवार जो बायेडन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं आहे. बायडेन यांना एकूण ३०६ इलेक्टोरल कॉलेजची मते मिळाली. दुसऱ्या बाजूला डोनाल्ड ट्रम्प सत्ता हस्तांतरणासाठी तयार झाले आहेत. त्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्या हजारो समर्थकांनी वॉशिंग्टनमधील डीसीमीधील कॅपिटॉल इमारतीमध्ये हिंसाचार केला. इलेक्टोरल कॉलेजच्या मतमोजणीमध्ये अडथळे आणण्याचे त्यांनी प्रयत्न केले. पण अखेर अमेरिकन काँग्रेसने बायडेन यांच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडीवर शिक्कामोर्तब केलं आहे.

About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment