केंद्राने लागू केलेल्या तिन्ही कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी पंजाबमधील होशियारपुरमध्ये भाजपा नेत्याच्या घरासमोर शेणाने भरलेली ट्रॉली रिकामी करणाऱ्या आंदोलकांविरोधात पोलिसांनी थेट हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी घडलेल्या या प्रकरणानंतर आंदोलकांवर करवाई करण्याची मागणी ज्यांच्या घऱासमोर हा प्रकार घडला ते माजी मंत्री तीक्ष्ण सूद यांनी केली होती. या प्रकरणामध्ये होशियारपुर पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी खास चार सदस्यांची टीमही तयार करण्यात आल्याचे वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिलं आहे.
भारती किसान युनियन राजेवालचे नेत्यांनी या प्रकरणामध्ये आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी मागणी केली आहे. तातडीने हे गुन्हे मागे घेतले नाही तर सात जानेवारी रोजी जालंदरमधील रस्त्यांवर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनेनं दिलं आहे. तसेच सरकारने आमचं म्हणणं ऐकलं नाही तर होशियारपूरमध्ये जो शेणाची ट्रॉली मंत्र्याच्या घरासमोर रिकामी करण्याचा प्रकार घडला तोच पुन्हा अनेक ठिकाणी पाहायला मिळेल असा इशाराही संघटनेनं दिला आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment