कोरोना विषाणूच्या नवीन प्रकारानं (new SARS-CoV-2 variant) आता जगभर थैमानकोरोना विषाणूच्या नवीन प्रकारानं (new SARS-CoV-2 variant) आता जगभर थैमान घालायला सुरुवात केली आहे. ब्रिटन (Britain) व्यतिरिक्त हा विषाणू (Corona Virus)आता जगातील इतरही देशांत पसरला आहे. या विषाणूबाबत शास्त्रज्ञांनी (Scientist) आता एक धक्कादायक खुलासा केला आहे. शास्त्रज्ञांच्या मते, हा नवीन कोरोना विषाणू तरुणांमध्ये झपाट्याने पसरत आहे. इम्पीरियल कॉलेज लंडनने केलेल्या संशोधनातून (Research) असं दिसून आलं आहे. कोरोना विषाणूचा नवीन स्ट्रेन (Corona virus new strain) 20 वर्षांखालील तरुणांमध्ये (Young man) झपाट्यानं पसरत असल्याचंही या संशोधनात म्हटलं आहे.

नोव्हेंबर महिन्यात कोरोनाचा हा नवीन स्ट्रेन खूप वेगात पसरल्याचंही संशोधनातून समोर आलं आहे. ब्रिटनमध्ये जवळपास तीनपट ही नवीन प्रकरणं वाढली आहेत. वैज्ञानिकांच्या मते, केवळ 20 वर्षांखालील लोकांनाच नव्हे तर इतर वयोगटातील लोकांनाही या नव्या विषाणूची वेगाने लागण होत आहे. इम्पीरियल कॉलेजने गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात ब्रिटनमधील सर्व शाळा सुरु असताना संबंधित डेटा गोळा केला होता. नवीन कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, ख्रिसमस नंतर शाळा बंद करण्याचा निर्णय ब्रिटनने घेतला आहे. 11 जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

सध्या ब्रिटनमध्ये कोरोना लसीकरणाची मोहीम जोरात सुरू आहे. आतापर्यंत सुमारे 9 लाख 40 हजार पेक्षा अधिक लोकांना लशीचे डोस देण्यात आले आहेत. याठिकाणी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि AstraZeneca च्या कोविशिल्ड आणि फायझर या लशी दिल्या जात आहेत. याबाबत सकारात्मक बातमी अशी की, ही लस नवीन कोरोना विषाणूवरही प्रभावी ठरत असल्याचं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.

About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment