प्रतीक्षा संपली! केजीएफ चॅप्टर 2 चा टीझर एक दिवस आधीच प्रदर्शितदाक्षिणात्य चित्रपटांमधील सर्वाधिक चर्चेत राहिलेला चित्रपट म्हणजे ‘केजीएफ चॅप्टर – १’. तुफान यश आणि लोकप्रियता मिळालेल्या या चित्रपटाच्या सिक्वलची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. त्यामुळेच या चित्रपटाच्या टीमने प्रेक्षकांसाठी खास सरप्राइज दिलं आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ‘केजीएफ चॅप्टर 2’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. विशेष म्हणजे दिलेल्या वेळेच्या एक दिवस आधीच हा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.

दाक्षिणात्य सुपरस्टार यशच्या वाढदिवसाची भेट म्हणून केजीएफ चॅप्टर 2 चा टीझर प्रदर्शित करणार होते. मात्र, प्रेक्षकांचं प्रेम आणि चाहत्यांकडून होत असलेल्या मागणीमुळे हा चित्रपट एक दिवस आधीच प्रदर्शित करण्यात आला आहे. होमबेल फिल्म्सच्या युट्यूब चॅनेलवर ७ जानेवारी २०२१ ला रात्री ९.२९ वाजता हा टीझर प्रदर्शित झाला.

टीझरच्या सुरुवातीला रॉकीची आई आणि त्याचं बालपण दाखवण्यात आलं आहे. त्याच्या आईने त्याला लहानाचं मोठं कसं केलं आणि कोणत्या परिस्थितीत तो मोठा झाला. तसंच त्याने दिलेलं वचन आता पूर्ण करण्याची वेळ आली आहे. या टीझरमध्ये अभिनेत्री रविना टंडन झळकली असून या चित्रपटात ती एका राजकीय व्यक्तीच्या भूमिकेत झळकणार असल्याचं दिसून येत आहे. तसंच संजय दत्तचीदेखील झलक या टीझरमध्ये पाहायला मिळाली. तसंच सुपरस्टार यशदेखील त्याच्या दमदार स्टाइलमध्ये झळकला आहे.

दरम्यान, ‘केजीएफ चॅप्टर – १’ हा चित्रपट ज्या ठिकाणी संपला, तेथूनच पुढे केजीएफ चॅप्टर 2 ची कथा सुरु होत आहे. या सिक्वलमध्ये संजय दत्त आणि रविना टंडन हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.प्रशांत नील दिग्दर्शित हा चित्रपट तेलुगू, हिंदी, कन्नड आणि तामिळ या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. मात्र, अद्याप या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment