सावधान! कोरोनाची भीती वाढली! कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा दुप्पट

 देशातील प्रत्येक नागरिक आज कोरोनाची (Coronavirus) लशीच्या प्रतीक्षेत आहे. राज्यात अनेक ठिकाणी कोरोनाचे नियम शिथिल करण्यात आले असली तरी नवकोरोनाची भीती कायम आहे. कालच्या तुलनेने आज कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा दुप्पट झाला आहे. आज 60 पेक्षा जास्त मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. 4 जानेवारी ला 29 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली होती. त्यानुसार कालच्या तुलनेत आज मृतांची संख्या दुप्पटीने वाढली आहे. ही बाब चिंता वाढवणारी आहे.

गेल्या 24 तासात राज्यात 3160 नवीन रुग्णांचे निदान झाले असून आज 64 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.55 % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 13061976 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 1950171 (14.93 टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 241557 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 1788 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.





About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment