बॉलिवूडचा प्रसिद्ध फॅशन डिझायनर स्वप्निल शिंदेने नव्या वर्षात त्याचं नवं रुप आणि नवं अस्तित्व लोकांसमोर आणलंय. स्वप्निलने ट्रान्सवुमन झाल्याचा खुलासा करत सोशल मीडियावर नवीन फोटो पोस्ट केले आहेत. स्वप्निल शिंदेची आता सायशा शिंदे झाली आहे. त्याच्या फोटोवर कमेंट्स व लाइक्सचा वर्षाव होत असून अनेक बॉलिवूड कलाकारांनीही त्याला साथ दिली आहे.
या नवीन फोटोंमध्ये सायशाचा लूक पाहायला मिळतोय. या फोटोंसोबतच सायशाने एक पोस्ट लिहीत ट्रान्सवुमन झाल्याबाबत खुलासा केला आहे. लहानपणी कशाप्रकारे स्वप्निलला एकटेपणा, मनाचा गोंधळ आणि लोकांच्या टीकांचा सामना करावा लागला याबाबत तिने या पोस्टमध्ये लिहिलं. ‘शाळा आणि कॉलेजमध्ये जेव्हा सगळी मुलं मला माझ्या वागण्यावरून टीका करत होते तेव्हा माझ्या मनावर खूप वार झाले. जे अस्तित्व माझं नाही ते जगताना मला गुदमरल्यासारखं होत होतं. वयाच्या विसाव्या वर्षी NIFT दरम्यान मी माझं सत्य स्वीकारण्याचं धाडस केलं आणि तेव्हा खऱ्या अर्थाने मी मुक्त झाले. पुरुषांकडे आकर्षित होत असल्याने मी समलैंगिक आहे असं सुरुवातीला मला वाटलं. पण सहा वर्षांपूर्वी मी स्वत: पूर्णपणे स्वीकारलं आणि आता मी समलैंगिक नाही तर ट्रान्सवुमन आहे’, असं सायशाने लिहिलं.
0 comments:
Post a Comment
Please add comment