राशिभविष्य

 


 1. मेष : भागिदारीतून चांगला फायदा होईल. स्त्रियांशी मैत्री वाढेल. चांगले वाहन सौख्य लाभेल. ओळखीचा चांगला लाभ होईल. आनंदी दृष्टिकोन ठेवाल.
 2. वृषभ : उगाच चिडचिड होईल. क्षुल्लक गोष्टी नजरेआड कराव्यात. आत्मविश्वासाने कामं करावीत. कफाचा त्रास जाणवेल. ठामपणा ठेवावा लागेल.
 3. मिथुन : कलेचा मनापासून आनंद घ्याल. जवळच्या सहलीचे आयोजन कराल. जोडीदाराची प्रगल्भता लक्षात येईल. मुलांशी सुसंवाद साधावा. मनातील अकारण आलेली भीती काढून टाकावी.
 4. कर्क : सहकुटुंब सहलीचे आयोजन कराल. घरातील वातावरण प्रसन्न राहील. कामाला अपेक्षित गती येईल. मुले खेळत प्राविण्य मिळवतील. तुमची धिटाई वाढेल.
 5. सिंह : जवळचा प्रवास मजेत करता येईल. जमिनीच्या व्यवहारात लाभ संभवतो. मुलांची प्रगती दिसून येईल. घरातील किरकोळ कुरबुरी दूर कराव्यात. हस्तकलेचे कौतुक केले जाईल.
 6. कन्या : कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. अंगीभूत कला जोपासता येईल. कामातील उत्साह वाढेल. अधिक उर्जेने कामाला लागाल. तुमचा मान वाढेल.
 7. तूळ : आवडत्या कामात मन रमवाल. दिवस स्वछंदतेत जाईल. खर्च वाढू शकतो. ऐषारामाच्या कल्पनेत रमून जाल. व्यावसायिक लाभ उत्तम राहील.
 8. वृश्चिक : अडचणीतून मार्ग काढता येईल. स्वत:च्या मतावर ठाम राहाल. घरात मंगल कार्य घडेल. हातातील अधिकार वापरता येतील. मित्र मंडळ जमवाल.
 9. धनू : शांततेने मार्ग काढाल. कौटुंबिक खर्च वाढेल. परिस्थिती योग्य प्रकारे हाताळाल. त्रासातून मार्ग निघेल. जबाबदारीची जाणीव ठेवा.
 10. मकर : कामाचा व्याप वाढू शकतो. काही वेळ स्वत:साठी द्यावा. कामाचा उरक वाढवाल. जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल. रेंगाळलेली घरगुती कामे पूर्ण होतील.
 11. कुंभ : कलाकुसरीकडे ओढ वाढेल. कौटुंबीक सौख्यात भर पडेल. मानापमान मनावर घेऊ नका. योग्य वेळेची वाट पहावी. सामाजीक कार्यात हातभार लावाल.
 12. मीन : रेस, सट्टा यांतून फायदा संभवतो. कामाचे योग्य मूल्यमापन करावे. थोरांचे सहकार्य लाभेल. मोठ्या लोकांत उठ-बस वाढेल. वरिष्ठांना खूष करावे.

— ज्योतिषी विद्याधर करंदीकर

About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment