राशिभविष्य

 1. मेष : कामातून समाधान शोधाल. जवळचे नातेवाईक भेटतील. प्रेमविवाहात सबुरीने घ्यावे. वारसाहक्काची कामे निघतील. जुनी येणी वसूल होतील.
 2. वृषभ : प्रवासातील अडचणी दूर कराव्यात. घरासाठी दगदग वाढेल. सकारात्मक विचारांनी वाटचाल करावी. मोठ्या लोकांची गाठ पडेल. अंगीभूत कला सादर करता येईल.
 3. मिथुन : आशावादी दृष्टिकोन ठेवावा. मनातील चुकीचे विचार काढून टाकावेत. परोपकाराची जाणीव ठेवाल. मनात नसते मांडे रचू नका. घरात नातेवाईक गोळा होतील.
 4. कर्क : प्रेमात फसवणुकीची शक्यता. वरिष्ठांच्या जास्त पुढे करू नका. धोरणीपणाने वागाल. नातेवाईकांकडून विरोध होवू शकतो. प्रलोभनात वाहवत जाऊ नये.
 5. सिंह : आवडीचे पदार्थ चाखाल. मुलांना योग्य प्रशिक्षण घेता येईल. अकारण ताणतणावाला बळी पडू नका. आरोग्यात सुधारणा होईल. जबाबदारीत वाढ होईल.
 6. कन्या : आवडत्या गोष्टी करण्यावर भर द्याल. दिवस मनाजोगा व्यतीत कराल. नियमांचे काटेकोर पालन करावे. वाहनांवरील वेग नियंत्रित ठेवावा. हाताखालील लोकांचे प्रश्न नीट हाताळावेत.
 7. तूळ : घरातील कुरबुरी दूर कराव्यात. जोडीदाराची प्रगती होईल. स्थावर संबंधीचे प्रश्न सोडवावेत. आधुनिक विचारांची जोड घ्यावी. सरकारी योजनेचा लाभ घ्यावा.
 8. वृश्चिक : आततायीपणे वागू नये. क्षुल्लक गोष्टी फार मनावर घेऊ नयेत. आत्मविश्वासाने वाटचाल करता येईल. रखडलेली कामे उरकून घ्यावीत. कौटुंबिक बाबतीत दिलासा मिळेल.
 9. धनू : आर्थिक व्यवहार सबुरीने करावेत. नवीन दृष्टिकोन ठेवावा. सामाजिक बाबीत फार लक्ष घालू नका. सहलीचे आयोजन कराल. लोकोपयोगी कामे कराल.
 10. मकर : मानसिक त्रास काहीसा वाढू शकतो. कामाच्या वेळा सांभाळाव्यात. गप्पागोष्टींमध्ये वेळ घालवाल. चित्त चांचल्य जाणवेल. अडथळ्यातून मार्ग काढाल.
 11. कुंभ : झोपेची तक्रार जाणवेल. खर्चाचे प्रमाण वाढू शकते. मनात उगाचच चिंता लागून राहील. कल्पनाशक्तीला चांगला वाव मिळेल. निराशा दूर सारावी.
 12. मीन : अधिकारी व्यक्तींची गाठ पडेल. थोरांच्या सहवासात लाभेल. काही गोष्टी लपविण्याकडे कल राहील. व्यावसायिक वाढीचा विचार करावा. कामाच्या ठिकाणी मान वाढेल.

About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment