जम्मू-काश्मीरमधील सोपोर येथे केंद्रीय रिझर्व्ह पोलीस फोर्स
(सीआरपीएफ)च्या पथकावर दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात सीआरपीएफचा
जवान शहीद झाला तर एका नागरिकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय अन्य तीन जवान
जखमी झाले आहेत. यातील दोन जवानांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती
सीआरपीएफकडून मिळाली आहे.
सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परिसरास जवानांनी
घेराव दिला असून, शोधमोहीम सुरू आहे. दहशतवाद्यांनी सापळा रचून पेट्रोलिंग
पार्टीवर हल्ला केल्याचे सांगितले जात आहे.a
0 comments:
Post a Comment
Please add comment