![]() |
मुख्यमंत्री आदित्यनाथांमुळे ८५ हजार लोकांचे प्राण वाचले! |
‘उत्तर प्रदेशात जे २०१७ पूर्वी शक्य नव्हते, ते मुख्यमंत्री आदित्यनाथ
यांनी करून दाखविले आहे. त्यांनी करोनाच्या साथीत चांगली पूर्वतयारी करून
आतापर्यंत ८५ हजार लोकांचे प्राण वाचवले आहेत’, अशी स्तुतिसुमने पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी उधळली आहेत.
‘आत्मनिर्भर उत्तर प्रदेश रोजगार अभियान’ योजनेचा आरंभ करताना मोदी
म्हणाले की, ‘‘उद्योग संघटनांनी स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देण्याची
गरज आहे. त्यातून रोजगार तयार होतील. आदित्यनाथ यांनी करोना साथीची
परिस्थिती चांगली हाताळली आहे. २०१७ पूर्वीच्या राज्य सरकारांना हे शक्य
झाले नसते. आदित्यनाथ यांनी चांगली तयारी केल्याने ८५ हजार लोकांचे प्राण
वाचले आहेत.’ मोदी यांनी २०१७ पूर्वीच्या म्हणजे भाजपेतर सरकारांच्या
काळाचा उल्लेख केला आहे. तेव्हाची सरकारे आता असती तर आताचे कोविड- १९
साथीचे आव्हान पेलू शकली नसती. आदित्यनाथ यांनी ते समर्थपणे पेलले आहे.
मोदी यांनी यावेळी सहा जिल्ह्य़ांतील ग्रामस्थांशी संवाद साधला.
0 comments:
Post a Comment
Please add comment