भारत आणि चीनच्या सैन्यात तणाव |
लडाख सीमा भागात तणाव सुरू असताना चीनकडून भारतावर दबाव टाकण्यास सुरुवात झाली आहे. एका बाजूला सीमेवरील तणाव निवळण्यासाठी लष्करी अधिकाऱ्यांच्या चर्चा सुरू ठेवायच्या आणि दुसरीकडे युद्ध सराव करण्याचे दुहेरी धोरण चीनने आखले आहे.
चीनने नुकत्याच आपल्या रणगाड्यांचा युद्ध सराव केला असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
चीन सरकारच्या ग्लोबल टाइम्स या वृत्तपत्राने ट्विटरवर हॅण्डलवर चिनी सैन्याचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीने मध्य चीनमधील हुबेई प्रातांतील उत्तर-पश्चिम क्षेत्रात हजारो पॅराट्रूपर्स आणि चिलखती वाहनांसह युद्ध सराव केला. यामध्ये रणगाड्यांचाही समावेश करण्यात आला होता. या युद्ध सरावा दरम्यान, सीमा भागातील युद्धकाळात वेगाने शस्त्र आणि सैन्याला अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. चिनी सैन्य पूर्णपणे तयार असून अवघ्या काही तासात ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असल्याचे चिनी तज्ञांनी सांगितले. चायना सेंट्रल टेलिव्हिजनने(सीसीटीव्ही) सांगितले की, शनिवारी भारतालगतच्या सीमेवरील एका अज्ञात भागात चिनी सैन्याच्या हवाई दलाने एअरबोर्न ब्रिगेडने नागरी विमान वाहतूक, लॉजिस्टीक ट्रान्सपोर्टेशन चॅनल आणि रेल्वेच्या माध्यामातून हजारो पॅराट्रूपर्सना तैनात केले आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment