नेपाळमधून दहशतवाद्यांची घुसखोरीची शक्यता, बिहारमध्ये ‘हाय अलर्ट’

नेपाळच्या हद्दीमार्गे तालिबान आणि जैश -ए-मोहम्मद या संघटनांचे दहशतवादी घुसखोरी करण्याची माहिती मिळाल्यानंतर, बिहार पोलिसांच्या विशेष शाखेने राज्यात हाय अलर्ट जारी केला आहे. विशेष शाखेकडून सर्व एसपी, एसएसपी यांना तसे पत्रक पाठवून कळवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने पाकिस्तानी सैन्याद्वारे प्रशिक्षित पाच ते सहा तालिबान आणि जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांना नेपाळमार्गे बिहारमध्ये घुसखोरी करण्याची योजना आखली आहे. आयएसआयकडून दहशतवादी हल्ला घडवण्याची तयारी सुरू असल्याचीही माहिती मिळत आहे. त्यांच्या निशाण्यावर मोठे राजकीय नेते व दिल्लीतील भाग असण्याची शक्यता आहे.
या अगदोर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने शनिवारी खालिस्तान लिबरेशन फ्रंट मॉड्युलचा भांडाफोड करत, तीन संशयीत दहशतवाद्यांना अटक केली होती. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, या दहशतवाद्यांच्या अटकेमुळे हत्येचा कट व जबरदस्ती वसुलीचा त्यांचा प्रयत्न आम्ही उधळून लावला आहे. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून तीन पिस्तुलं व सात जिवंत काडतूसं हस्तगत केली होती.
अटक करण्यात आलेले तिन्ही आरोपी खालिस्तान लिबरेशन फ्रंटशी निगडीत असल्याची माहिती समोर येत आहे. आरोपींची ओळख दिल्ली निवासी मोहींदर पाल सिंह (२९), पंजाब निवासी गुरतेज सिंह (४१) आणि हरियाणा निवासी लवप्रीत (२१) असल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी दावा केला आहे की, ही लोकं परदेशात असलेले त्यांच्या प्रमुखांच्या व पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या इशाऱ्यानुसार दहशतवादी कारवाया घडवण्याच्या तयारीत होते. पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत. शिवाय त्यांची योजना नेमकी काय होती हे देखील जाणण्याचा प्रयत्न सुरू आहे.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment