अमेरिकेत करोनाने थैमान घातला असताना नागरिकांना मास्क वापरणं अनिवार्य
करण्यात आलं असून वारंवार नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं जात आहे.
एकीकडे सरकार लोकांना मास्क वापरण्यास सांगत असताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड
ट्रम्प मात्र कोणत्याही ठिकाणी मास्क वापरताना दिसत नाहीत. याबद्दल आरोग्य
आणि मानवी सेवा सचिव अॅलेक्स अजहर यांनी सांगितलं असून एकीकडे सरकार
लोकांना आवाहन करत असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी मास्क न वापरण्यामागे काही
वेगळी परिस्थिती असल्याचं म्हटलं आहे. असोसिएट प्रेसने यासंबंधी वृत्त दिलं
आहे.
काही राज्यांमध्ये करोनाबाधित रुग्णसंख्या वाढली असल्याचं सांगताना
अॅलेक्स यांनी सांगितलं की, “मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत
लोकांनीच आपल्या वर्तनाची जबाबदारी घेणं गरजेचं आहे”.
डोनाल्ड ट्रम्प यांनी मास्क न वापरण्यासंबंधी बोलताना त्यांनी सांगितलं की,
“डोनाल्ड ट्रम्प यांना आपल्या सरकारच्या आदेशांचं पालन करण्याची गरज नाही.
एका राष्ट्राचे प्रमुख असल्याने त्यांची रोज चाचणी केली जात आहे. आपण आहोत
त्यापेक्षा वेगळ्या परिस्थितीत ते आहेत”. यावेळी अजहर यांनी आपण कधीही
डोनाल्ड ट्रम्प यांना मास्क घालण्यास सांगितलं नसल्याची माहिती दिली.
0 comments:
Post a Comment
Please add comment