देशभरात २४ तासांत तब्बल १९ हजार ४५९ नवे पॉझिटिव्ह, ३८० मृत्यू

जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणुचा प्रादुर्भाव देशात अद्यापही झपाट्याने वाढतच आहे. मागील चोवीस तासांत देशभरात तब्बल १९ हजार ४५९ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर, ३८० जणांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता ५ लाख ४८ हजार ३१८ वर पोहचली आहे.
देशभरातील एकूण ५ लाख ४८ हजार ३१८ करोनाबाधितांमध्ये, सध्या उपचार सुरू असलेले २ लाख १० हजार १२० रुग्ण, उपचारानंतर सुट्टी देण्यात आलेले ३ लाख २१ हजार ७२३ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या १६ हजार ४७५ जणांचा समावेश आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.
कोविड १९ चाचण्यांसाठी घरगुती वापराचे चाचणी संच लवकरच प्रत्यक्षात येणार असून दिल्लीची भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) व पुण्याची राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल) या दोन संस्था पर्यायी चाचणी पद्धत शोधण्याच्या प्रयत्नात आहेत. लोक घरीच ही चाचणी करू शकतील व लगेच त्याचा निकालही त्यांना मिळेल. औद्योगिक व वैज्ञानिक संशोधन परिषद म्हणजे सीएसआयआरच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प हाती घेण्यात आला असून त्याला मायक्रोसॉफ्ट इंडिया या संस्थेने आर्थिक मदत दिली आहे. एक महिन्यात हा संच तयार होणार आहे. या प्रयोगात सहभागी वैज्ञानिकांनी कोविड विरोधात एलायझा (एन्झाइम लिंकड इम्युनोअ‍ॅसे) यावर आधारित चाचणी विकसित केली आहे.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment