![]() |
१६ हजार ३९४ कोटी गरिबांच्या खात्यात जमा-अर्थमंत्री निर्मला सीतारामन |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजबद्दलची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून दिली जात आहे. मागील तीन परिषदांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांना दिल्या जाणाऱ्या मदतीची घोषणा केल्यानंतर अर्थमंत्र्यांनी रविवारी सरकारकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. देशातील गरिबांच्या खात्यात १६ हजार ३९४ कोटी रूपये थेट जमा करण्यात आले असल्याचं त्यांनी सांगितलं.
निर्मला सीतारामन यांनी २० लाख कोटी रूपयांच्या पॅकेजमधून गरिबांना दिल्या जाणाऱ्या मदतीची माहिती दिली. सीतारामन म्हणाल्या,”करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि गरिबांवर उपाशीपोटी झोपण्याची वेळ येऊ नये म्हणून सरकारन मागील दोन महिन्यांच्या काळात अनेक उपाययोजना केल्या. गरिबांना, स्थलांतरित मजुरांना मदत देण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान गरीब योजनेतंर्गत ही मदत करण्यात आली. तंत्रज्ञानामुळे गरिबांना तातडीनं थेट मदत करता आली. आतापर्यत जनधन खात्यात १० लाख २२५ कोटी रुपये जमा करण्यात आले. विविध योजनातंर्गत १६ हजार ३९४ कोटींची मदत जमा करण्यात आली आहे. त्याचबरोबर २५ कोटी गरीब, मजुरांना गहु, तांदूळ मोफत वाटप करण्यात आलं, अशी माहिती सीतारामन यांनी दिली.
“स्थलांतर करणाऱ्या मजुरांची काळजीही सरकारकडून घेण्यात आली. या मजुरांना घरी जाण्यासाठी सरकारनं रेल्वे सेवा सुरू केली. त्याचबरोबर त्यांच्या भाड्याच्या ८५ टक्के खर्च केंद्रानं उचलला आहे. प्रवासादरम्यान त्यांच्या जेवणाची व्यवस्था सरकारनं केली आहे. अन्न धान्य दिल्यानंतर त्यासाठी उज्ज्वला गॅसयोजनेतंर्गत मोफत सिलेंडर देण्यात आले,” असं सीतारामन म्हणाल्या.
0 comments:
Post a Comment
Please add comment