युद्धासाठी तयार राहा, चीनच्या राष्ट्राध्यक्षांचा सैन्यदलांना आदेश


करोना व्हायरसमुळे जागतिक स्तरावर चीनची पुरती कोंडी झाली आहे. करोना संकटासाठी जगातील बहुतांश देश चीनला जबाबदार ठरवत आहेत. चहूबाजूंनी चीनवर दबाव वाढत चालला आहे. त्या पार्श्वभूमीवर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी देशातील सैन्य दलाचे प्रशिक्षण अधिक बळकट करण्याचे व युद्धसाठी तयार राहण्याचे निर्देश दिले आहेत.
“देशाची स्थिरता आणि सार्वभौमत्व टिकवून ठेवण्यासाठी देशातील सैन्य दलाचे प्रशिक्षण अधिक बळकट करा व युद्धसाठी तयार राहा” असे निर्देश जिनपिंग यांनी दिल्याचे वृत्त सरकारी माध्यमांनी दिले आहे.
चीनचा सध्या अमेरिका आणि भारताबरोबर वाद सुरु आहे. दोन्ही देशांबरोबर चीनचे संबंध ताणले गेले आहेत. सैन्यबळाचा वापर करुन तैवानचा जबरदस्तीने चीनमध्ये समावेश करण्याची मागणी स्थानिक पातळीवर होत आहे. त्याशिवाय चीन हाँगकाँगमध्ये नवीन राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू करण्याच्या तयारीमध्ये आहे. अमेरिकेने यावर खूप कठोर प्रतिक्रिया उमटू शकते असा इशाराही चीनला दिला आहे.
एकूणच या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चीन कोणासमोर बधणार नाही, हे दाखवून देण्यासाठी जिनपिंग यांनी थेट युद्धाची भाषा केली आहे. करोना व्हायरच्या संकटामुळे चीन एकाकी पडल्याचे चित्र आहे. कारण करोना व्हायरसच्या साथीची सुरुवात वुहान शहरातून झाली आणि चीनने हे सत्य दडपण्याचा प्रयत्न केला, असा आरोप त्यांच्यावर होत आहे.
चीनसोबत तणाव वाढला असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीत तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि देशाचे संरक्षण प्रमुख जनरल बिपीन रावत हजर होते. याआधी परराष्ट् सचिवांसोबत स्वतंत्र बैठक घेण्यात आली होती. एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत बैठक पार पडण्याआधी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांना बैठकीची माहिती दिली.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment