करोनाची लागण टाळण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प रोज घेतायत भारतीय औषध


करोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या गोळया घेत आहेत. स्वत: ट्रम्प यांनी सोमवारी ही माहिती दिली. हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या COVID-19 च्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ही गोळी घ्यावी असे ट्रम्प यांच्या स्वत:च्या सरकारचे निर्देश आहेत. पण ट्रम्प कोणालाही न जुमानता हायड्रॉक्सीक्लोरोक्विनची गोळी घेत आहेत.
करोनाची लागण होऊ नये म्हणून मागच्या आठवडयाभरापासून हायड्रॉक्सीक्लोरोक्विनची गोळी घेत असल्याचे ट्रम्प यांनी पत्रकारांना सांगितले. हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे मूळ मलेरियाचे औषध आहे. करोना व्हायरसविरोधात हे औषध गेमचेंजर आहे असा ट्रम्प यांचा दावा आहे. याच औषधाच्या पुरवठयावरुन डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला इशारा दिला होता. भारताने या गोळयांची डिलिव्हरी केल्यानंतर त्यांनी आभारही मानले.
हायड्रॉक्सीक्लोरोक्विन या गोळीचे साईडइफेक्टही आहेत तसेच करोना व्हायरसविरुद्ध ही गोळी तितकी परिणामकारक नाही असेही काही तज्ज्ञांचे मत आहे. ट्रम्प यांना त्यांच्या डॉक्टरने हायड्रॉक्सीक्लोरोक्विन ही गोळी न घेण्याचा सल्ला दिला आहे. “ही गोळी चांगली आहे. या औषधाबद्दल मी अनेक चांगल्या गोष्टी ऐकल्या आहेत. त्यामुळे ही गोळी घ्यायला मी सुरुवात केली” असे ट्रम्प म्हणाले.


करोनावरील उपचारासाठी रुग्णालयाबाहेर हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा उपयोग करु नका असा इशारा अमेरिकन एफडीएने दिला आहे. या औषधाचे साईड इफेक्टही असल्यामुळे त्यावर संशोधन सुरु आहे. हायड्रॉक्सीक्लोरोक्विन ही गोळी लुप्स, संधिवात या आजारांवरही वापरली जाते.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment