करोना व्हायरस कदाचित HIV सारखा कधीच नष्ट होणार नाही- WHO

करोना व्हायरस कदाचित HIV सारखा कधीच नष्ट होणार नाही- WHO
करोना व्हायरस कदाचित कधीच संपणार नाही. जगाला आता या व्हायरससोबत जगणे शिकावे लागेल असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने बुधवारी दिला. ‘अन्य विषाणूंप्रमाणे करोना व्हायरस कायम सोबत राहू शकतो. कदाचित तो कधीच नष्ट होणार नाही’ असे मायकल जे रेयान म्हणाले. ते WHO च्या आरोग्य आपातकालीन कार्यक्रमाचे प्रमुख आहेत.
त्यासाठी त्यांनी HIV च्या विषाणूचे उदहारण दिले. ‘HIV चा विषाणू आजही अस्तित्वात आहे तसेच करोना व्हायरस नेमका कधी निघून जाईल ते सांगता येणार नाही’ असे रेयान म्हणाले. “HIV चा विषाणू अजूनही नष्ट होऊ शकलेला नाही. पण ज्यांना या विषाणूची लागण झाली त्यांना उत्तम आरोग्य राखून दीर्घायुष्य कसे लाभेल ते मार्ग आपण शोधले. आपल्याला वास्तवाचा स्वीकार केला पाहिजे. करोना व्हायरसचा आजार कधी संपेल ते आपल्याला ठाऊक नाही” असे रायन म्हणाले.
मागच्यावर्षी चीनच्या वुहान शहरातून या करोना व्हायरसचा उगम झाला. आतापर्यंत जगभरातील ४२ लाख नागरिकांना या व्हायरसची बाधा झाली आहे. जगभरात तीन लाख लोकांचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. करोना व्हायरसवर अजून एकही ठोस औषध सापडलेले नाही. या व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी जगभरातील अनेक देश लॉकडाउनमध्ये आहेत. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. उपासमारीचा, रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.  अमेरिका, फ्रान्स, ब्रिटनसह जगातील प्रमुख देशांमध्ये करोनावर लस शोधण्याासठी मोठया प्रमाणावर संशोधन सुरु आहे. पण या आजाराला रोखणारे अजून एकही ठोस औषध सापडलेले नाही.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment