अन् त्या संशयितामुळे तेलगावकरांची धाकधूक वाढली अहवालाची प्रतिक्षा

अन् त्या संशयितामुळे तेलगावकरांची धाकधूक वाढली अहवालाची प्रतिक्षा

बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलिस हद्दीतील एका गावात मुंबईहून परतलेल्या संशयिताचे स्वॅब मंगळवारी राञी तपासणीसाठी पाठवले आहेत. त्या व्यक्तीने  तेलगाव येथील एका अॅटोरिक्शातुन प्रवास केल्याची माहिती उघड झाल्याने तेलगावकरांत अहवाल येई पर्यंत धाकधूक वाढली असुन भितीदायक वातावरण निर्माण झाले आहे.

यासंदर्भात समजलेली माहिती अशी की, परिसरातील  एक युवक मुंबईहुन काही दिवसांपूर्वी परतला आहे. त्या व्यक्तीस  आल्यानंतर शाळेत क्वारंटाईन केले गेले.दरम्यान गेल्या दोन दिवसांपुर्वी त्यास अस्वस्थ वाटल्याने सदर रुग्णास माजलगाव ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले असुन त्याचे स्वॅब मंगळवारी रात्री घेण्यात आले आहेत.आज सायंकाळपर्यंत अहवाल येईल अशी माहिती मिळत असुन सदर रुग्णाने तेलगांव येथील  एका अॉटोरिक्शात प्रवास केला असल्याचे बोलले जात असुन यामुळे तेलगांव करांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.




About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment