आजचे राशीभविष्य


  • मेष:-मानसिक अस्वास्थ्याला बळी पडू नका. गायन कलेचे कौतुक केले जाईल. सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल. आर्थिक प्रश्न मार्गी लागतील. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल.
  • वृषभ:-हौस पूर्ण करता येईल. मैत्रीचे संबंध जोडले जातील. इतरांवर तुमचा चांगला प्रभाव पडेल. कलेची आवड जोपासता येईल. मानसिक ताणतणाव दूर सारावा.
  • मिथुन:-आर्थिक निर्णय घाईने घेऊ नका. स्त्री वर्गापासून सावध राहावे. क्षणिक मोहाला बळी पडाल. अनाठायी खर्च केला जाईल. मनातील इच्छेला महत्त्व द्याल.
  • कर्क:-मित्र परिवारात वाढ होईल. दिवस कामात व गडबडीत जाईल. सर्वांना आनंदाने आपलेसे कराल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. व्यावसायिक लाभाने खुश व्हाल.
  • सिंह:-कामातून मानाची जागा मिळवाल. उत्कृष्ट बोलण्याने इतरांचे मन जिंकून घ्याल. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील. चैनीच्या वस्तू खरेदी कराल. कलाकारांचा नावलौकिक वाढेल.
  • कन्या:-कला जोपासायला वेळ काढता येईल. धार्मिक कामात मदत कराल. विशाल दृष्टिकोन ठेवून वागाल. कामातील अडथळे दूर होतील. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील.
  • तूळ:-जोडीदाराबरोबर क्षुल्लक कारणांवरून वाद संभवतो. आपलेच मत खरे करण्याचा प्रयत्न कराल. भागीदारीच्या व्यवसायात सबुरीने वागावे. वारसाहक्काची कामे फायदेशीर ठरतील. अचानक धनलाभ संभवतो.
  • वृश्चिक:-एकमेकांच्या मताचा आदर करावा. आपले मत शांतपणे मांडावे. सहकार्‍यांना सोबत घेऊन चालावे. हाताखालील लोकांवर लक्ष ठेवावे. प्रवासात सावधानता बाळगावी.
  • धनू:-लोकोपवादाकडे दुर्लक्ष करावे. आळस झटकून कामाला लागावे. रेस सट्टा सारख्या व्यवहारात सतर्क रहा. व्यसनाच्या आहारी जाऊ नका. नातेवाईकांची मदत मिळेल.
  • मकर:-प्रेमाच्या दृष्टीने मैत्री लाभेल. व्यवहारी भूमिका घ्यावी लागेल. तुमच्या छंदाचे कौतुक केले जाईल. गप्पा गोष्टी करण्यामध्ये गुंग व्हाल. सहवासातून नवीन संबंध दृढ होतील.
  • कुंभ:-घरगुती सुख सोईंकडे लक्ष द्याल. कौटुंबिक कटुता टाळण्याचा प्रयत्न करा. घरातील टाप-टिपी बाबत आग्रही राहाल. जवळच्या ठिकाणाला भेट देता येईल. क्षुल्लक गोष्टींवरून त्रागा करू नये.
  • मीन:-नातेवाईकांशी सलोखा वाढेल. कलेची आवड जोपसाता येईल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. खाण्यापिण्याची आवड दर्शवाल.
        -ज्योतिषी विद्याधर करंदीकर





About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment