आजचे राशीभविष्य

मेष:-छोट्याश्या गोष्टींनी नाराज होऊ नका. कौटुंबिक जबाबदारीची जाणीव मनात जागृत ठेवा. सर्वांशी गोडीने वागाल. कोणत्याही प्रकारचा उतावीळपणा करू नका. कामाची अचूक आखणी करावी.
वृषभ:-तुमच्यातील प्रतिभा जागृत ठेवा. मुलांबाबत शंका मिटतील. नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करावा. उत्तम वाहन सौख्य लाभेल. गुरुकृपेचा लाभ घेता येईल.
मिथुन:-कामानिमित्त प्रवास करावा लागेल. सतत कार्यमग्न राहाल. खिशाला कात्री लागू शकते. लहान-सहान कामासाठी धावपळ होईल. झोपेची तक्रार जाणवेल.
कर्क:-मानसिक ताण जाणवू शकतो. योग्य संधीची वाट पहावी लागेल. मनातील इच्छा पूर्ण होईल. काहीसे हट्टीपणाने वागाल. नवीन लोक संपर्कात येतील.
सिंह:-उष्णतेचा त्रास जाणवेल. जोडीदाराशी जुळवून घ्यावे लागेल. मनातील योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. आजचे काम उद्यावर ढकलू नका. जबाबदारी निभावून नेता येईल.
कन्या:-प्रवासातील क्षुल्लक अडचणी टाळाव्यात. पाय खेचणार्‍या लोकांकडे लक्ष ठेवावे. अपचनाचा त्रास जाणवेल. कामातील तांत्रिक बाजू लक्षात घ्याव्यात. प्रलोभनाला भुलू नका.
तूळ:-आरोग्याकडे लक्ष ठेवावे. नवीन गुंतवणुकीला वाव मिळेल. अनाठायी खर्च वाढू शकतो. वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल. रेस जुगारा पासून दूर राहावे.
वृश्चिक:-जोडीदाराशी मतभेदाची शक्यता आहे. घरातील वातावरण शांततापूर्ण ठेवावे. प्रवास जपून करावा. घरगुती कामात अधिक वेळ अडकून पडाल. आर्थिक गणित नव्याने मांडावे लागेल.
धनू:-हातातील अधिकार योग्य ठिकाणी वापरा. जवळच्या प्रवासात काळजी घ्यावी. आरोग्यात काहीशी सुधारणा संभवते. जोडीदाराचे मत विचारात घ्यावे. मनातील अरसिकता काढून टाकावी.
मकर:-कामानिमित्तचा प्रवास सावधानतेने करावा. जोडीदाराशी मतभेद संभवतात. रागावर नियंत्रण ठेवावे. भागीदारीच्या व्यवसायात सबुरी बाळगावी. तिखट व तामसी पदार्थ खाल.
कुंभ:- पित्त विकाराचा त्रास संभवतो. क्षुल्लक कारणाने डोकेदुखी वाढू शकते. घाईघाईने कोणतेही काम करू नका. नातेवाईकांशी मतभेद संभवतात. नवीन लोकांच्यात मिसळावे.
मीन:-सामुदायिक वादापासून दूर राहावे. मुलांच्या गोष्टी विरोधी वाटू शकतात. मानसिक चंचलता जाणवेल. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक केले जाईल. अनाठायी खर्च टाळावा.
-ज्योतिषी विद्याधर करंदीकर 




About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment