आजचे राशीभविष्य


मेष : कुटुंबातील सदस्याशी वैचारिक मतभेद होण्याची शक्यता. घरातील वातावरण गढूळ होण्याची शक्यता. आततायीपणा टाळा.


वृषभ : वेळेचे महत्त्व जाणा. सर्वांशी आपुलकीने वागा. घरातील कामामध्ये हातभार लावा.


मिथुन : जीवनावश्यक वस्तूंची खरेदी कराल. पती-पत्नीमधील नाते बहरेल. आहारविषयक पथ्ये पाळा.


कर्क : तणावरहित जगण्याचा प्रयत्न करा. अनावश्यक गोष्टीमध्ये वेळ वाया जाईल. घरातील ज्येष्ठ मंडळींनी प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये.

सिंह : आप्तेष्टांच्या कुत्सित बोलण्याने दुःखी व्हाल. मानसिक दुर्बलता जाणवेल. भगवंताचे नामस्मरण कराल.

कन्या : इतरांशी बोलताना तारतम्य बाळगा. प्रिय व्यक्तीच्या भावना समजून घ्या. महत्त्वाच्या कामात निष्काळजीपणा नका.

तुळ : योगा अथवा व्यायामाचे महत्त्व पटेल. मानसिक ताणातून बाहेर येण्यासाठी घरातल्यांशी मोकळा संवाद साधा. दानधर्म कराल.

वृश्चिक : वायफळ गोष्टींमध्ये रमू नका. गृहिणींनी घरातील अव्यवस्थितपणा टाळावा. उत्तरार्धात रंगाचा बेरंग होण्याची शक्यता.

धनु : सोशल मीडियामार्फत नवीन पाककृती शिकाल. वेळेचा सदुपयोग कराल. पाठ अथवा कंबरदुखीचा त्रास शक्य.

मकर : पत्नीच्या मताला प्राधान्य द्याल. महत्त्वाचा तिढा सुटेल. उत्तरार्धात आवडते छंद जोपासाल.

कुंभ : भूतकाळातील रम्य आठवणींमध्ये रममाण व्हाल. आसपासच्या जगाचा विसर पडेल. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका.

मीन : एखादे साहित्य अथवा आवडती कादंबरी वाचाल. मानसिक ताण कमी होईल. सकारात्मकतेने कामे कराल.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment