![]() |
आत्मनिर्भर भारत: निर्मला सीतारमण यांच्या पत्रकार परिषद |
विकासाला चालना देण्याबरोबरच स्वावलंबी भारतासाठी (आत्मनिर्भर भारत अभियान) हे पॅकेज तयार करण्यात आले आहे, असे सीतारामन यांनी सांगितले. सीतारामन यांनी दाक्षिणात्य भारतीयांना 'आत्मनिर्भर भारत' हे तामिळ, तेलगू आणि मल्याळम आणि कन्नड या चार भाषांमध्ये भाषांतरित करुन सांगितले.
करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजशी निगडीत माहिती सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अर्थराज्य मंत्री अनुराग ठाकूर उपस्थित होते. हे आर्थिक पॅकेज श्रमिकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, मध्यम वर्गासाठी आणि उद्योग जगतासाठीही असेल असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी म्हटलं होतं.
केंद्रात २०१४ मध्ये सत्तेत आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए-१ (राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार) च्या कार्यकाळात'आत्मनिर्भर भारत'ची बीजे रोवली गेली. २०१४ ते २०१९ या कालावधीत सरकारने सुधारणांचा धडाका लावला. या सरकारने समस्या ऐकल्या आणि समस्यांचे निराकरण केले. स्थलांतरित आणि गरिबांचा विचार करता थेट बँक खात्यात अनुदान दिल्याने आजच्या टाळेबंदीमध्ये फायदेशीर ठरली. बँक प्रतिनिधींनी गरिबांच्या घरी जाऊन त्यांना पैसे दिले. डीबीटी, मायक्रो इन्शुरन्स, जनधन, स्वच्छ भारत योजना, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना तसेच कृषी क्षेत्रात पीएम किसान योजना , पीएम फसल योजना या निर्णयक ठरल्या. बँकिंग क्षेत्रात स्वच्छ ताळेबंद , इज ऑफ डुईंग बिझनेस, जीएसटी लागू कोळसा क्षेत्रात सुधारणा, मत्स्य व्यवसायात सुधारणा करण्यात आल्या. वीज निर्मितीत भारत स्वावलंबी बनला असल्याचे त्यांनी सांगितले.
0 comments:
Post a Comment
Please add comment