मुंबईत भरधाव कार बसवर आदळून भीषण अपघात

मुंबईत भरधाव कार बसवर आदळून भीषण अपघात
भरधाव वेगात जाणारी कार बसवर आदळून मुंबईत १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. मरिन ड्राइव्हमध्ये हा अपघात झाला. अपघातात कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. अपघातात १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून एक जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृत्यू झालेला तरुण मुंबईतील हॉटेल व्यवसायिकाचा मुलगा आहे.
आर्यमन राजेश नागपाल आणि शौर्यसिंग शरद जैन हे दोघेही रात्री चौपाटीच्या दिशेने चालले होते. यावेळी उड्डाणपुलापासून १०० मीटर अंतरावर कार बसवर जाऊन आदळली. अपघातात आर्यमन आणि शौर्यसिंग दोघेही गंभीर झाले होते. दोघांनाही हरिकिशनदास रुग्णालयात नेण्यात आलं होतं. पण आर्यमन याला मृत घोषित करण्यात आलं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
आर्यमन राजेश नागपाल याचे वडील मुंबईतील हॉटेल व्यवसायिक आहेत. प्रेसिडेंट हॉटेलचे ते मालक आहेत. दरम्यान शौर्यसिंग शरद जैन गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. पोलीस याप्रकरणी सीसीटीव्ही तपासत असून कार नेमकं कोण चालवत होतं याची माहिती घेतली जात आहे.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment