'व्हाइट हाउस'ने पंतप्रधान मोदींना केले अनफॉलो

Howdy, Modi!': Trump to join India's Modi at Houston gathering ...
'व्हाइट हाउस'ने पंतप्रधान मोदींना केले अनफॉलो

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिका राष्ट्राध्यक्षांचे कार्यालय व्हाइट हाउसने ट्विटरवर अनफॉलो केले आहे. करोनाच्या विरोधात लढाईत अमेरिकेला हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधांची मदत दिल्यानंतर व्हाइट हाउसने त्यांना फॉलो करण्यास सुरुवात केली होती. व्हाइट हाउसने 
पंतप्रधान मोदी, पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रपती भवनासहित सहा ट्विटर हॅण्डलला अनफॉलो केले आहे.

व्हाइट हाउसने अचानकपणे अनफॉलो का केले, याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. याआधी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधांचा पुरवठा केल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले होते. त्यानंतर व्हाइट हाउसच्या ट्विटर हॅण्डलने पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती कार्यालयाला फॉलो करण्यास सुरुवात केली होती. सध्या व्हाइट हाउस १३ जणांना ट्विटरवर फॉलो करत असून हे सर्वजण अमेरिकन सरकारमधील महत्त्वाच्या व्यक्ती आहेत.

याआधी व्हाइट हाउसच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून पंतप्रधान मोदींनी फॉलो करण्यात येत होते. पंतप्रधान मोदी हे जगातील एकमेव नेते होते. मात्र, अचानकपणे ट्विटरवर व्हाइट हाउसने पंतप्रधान मोदींसह सहा भारतीय ट्विटर हॅण्डलला अनफॉलो केल्यामुळे चर्चा सुरू झाली आहे.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment