CoronaVirus: अमेरिकेत चीनविरुद्ध मोर्चेबांधणी

CoronaVirus: अमेरिकेत चीनविरुद्ध मोर्चेबांधणी

चीनमधील उत्पत्ती असलेल्या करोना विषाणूची सर्वाधिक झळ सोसणाऱ्या अमेरिकेत आता त्या देशावरील अवलंबित्व कमी करण्याचा सूर अधिक तीव्र होऊ लागला आहे. एकीकडे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्याने या वैश्विक महामारीसाठी थेट चीनला जबाबदार धरत असतानाच अमेरिकेतील राजकीय वर्तुळातूनही त्या देशाकडून भरपाई वसूल करण्याबाबत तसेच औद्योगिक उत्पादने व खनिजासाठीचे अवलंबित्व कमी करण्याबाबत आग्रह धरला जात आहे.

करोनामुळे झालेले मृत्यू, औद्योगिक नुकसान, आर्थिक मंदी यासाठी चीनकडून नुकसान भरपाई वसूल करण्याचा सूर अमेरिका, ब्रिटन व जर्मनीमध्ये उमटत आहे. जर्मनीने या भरपाईची किंमत १४० अब्ज डॉलर इतकी निश्चित केली आहे. अमेरिकेत ५९ हजार जणांचा मृत्यू व १० लाख जणांना लागण झाली आहे. त्यामुळे अमेरिकाही चीनकडून ही भरपाई वसूल करण्याचा गांभीर्याने विचार करीत आहे. काँग्रेस सदस्य ब्रायन मस्ट यांनी मंगळवारी विधेयक मांडून भरपाईच्या रकमेएवढी देणी रोखण्याची मागणी केली. अमेरिकेच्या संरक्षण उत्पादनांमध्ये लागणारे १७ विशेष धातू तसेच खनिजे चीनकडून आयात केली जातात. ऑक्टोबर, २०१८च्या अहवालानुसार अमेरिकेच्या संरक्षण प्रकल्पांसाठी आवश्यक धातू व खनिजे मिळवण्यासाठी चीनवरील अवलंबित्व सातत्याने वाढत आहे. या पुरवठ्यात खंड पडल्यास अमेरिकेच्या सुरक्षा प्रकल्पांना धोका उद्भवू शकतो. याचाच हवाला देत सिनेटर टेड क्रूझ यांनी संरक्षणमंत्री मार्क एस्पर यांच्याकडे अमेरिकेतच या धातू व खनिजांची पुरवठा साखळी निर्माण करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

विशेष धातू, १३ इतर धातू तसेच खनिजांसाठी अमेरिका १०० टक्के इतर देशांतून होणाऱ्या आयातीवर अवलंबून आहे. तर १० अन्य खनिजांची ७५ टक्के गरज अन्य देशांकडून भागवली जाते. त्यामुळेच आता संरक्षण उत्पादनांबाबत चीनची साथ सोडण्याची मागणी अमेरिकेत जोर धरू लागली आहे.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment