![]() |
अमेरिकेत कोरोनाचे थैमान, 24 तासांत 2 हजार 494 बळी तर आतापर्यंत 53 हजार 511 वर मृत्यू |
जगभरात सर्वत्र फैलाव झालेल्या जीवघेण्या करोना व्हायरसने जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेत अक्षरशा थैमान घातले आहे. मागील चोवीस तासांत अमेरिकेत तब्बल 2 हजार 494 जाणांचा करोनाने बळी घेतला आहे.
यामुळे अमेरिकेत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या संख्या आता एकूण 53 हजार 511 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत अमेरिकेत तब्बल नऊ लाख 36 हजार 293 जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोविड १९ म्हणजे करोनाचा सामना करण्यासाठी अमेरिकेत औषधे व लशी मिळून एकूण ७२ घटकांवर चाचण्या सुरू असून २११ घटक हे कोविड १९ उपचारातील नियोजन पातळीवर आहेत, असे ट्रम्प प्रशासनाने म्हटले आहे.
अन्न व औषध प्रशासन आयुक्त स्टीफन हान यांनी व्हाइट हाउस येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, लस व औषधे शोधून काढण्याचे काम प्रगतिपथावर असून अन्न व औषध प्रशासनाने दोन आस्थापनांना लशीच्या चाचण्या करण्यास परवानगी दिली आहे. कोविड १९ म्हणजे करोनावर उपचार शोधून काढण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत. सध्यातरी कोविड १९ वर कुठलेही मान्यता प्राप्त औषध नाही. व्यावसायिक, संशोधक व खासगी क्षेत्र यांना आम्ही उपचार शोधून काढण्यात सहभागी केले आहे, औषधे व लशी मिळून ७२ चाचण्या सुरू आहेत. २११ घटकांच्या चाचण्या नियोजन पातळीवर आहेत. त्यात विषाणूविरोधी उपचार व रक्तद्रव उपचारांचा समावेश करण्यात आला आहे. उत्पादकांना प्रतिपिंड चाचण्यांसाठीच्या संचांची अधिकृत तपासणी करण्यास सांगण्यात आले आहे. या चाचण्यांना एफडीएने परवानगी मात्र दिलेली नाही.
0 comments:
Post a Comment
Please add comment