मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यावर तैनात असलेल्या एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाला करोना व्हायरसची लागण झाली आहे. या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा Covid-19 चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या संपर्कात असलेल्या निकटच्या सहा जणांना क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. वर्षा हे मुख्यमंत्र्यांचे सरकारी निवासस्थान आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.
दरम्यान वर्षा बंगल्यावरच तैनात असलेल्या एका महिला कॉन्स्टेबलचाही करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. न्यूज १८ ने हे वृत्त दिले आहे. दरम्यान सध्या वर्षा बंगल्यावर कोणी राहत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कुटुंबासह वांद्र्यात मातोश्री येथे राहतात.
“वर्षा बंगल्यावरील करोनाची लागण झालेल्या महिला कॉन्स्टेबलला आम्ही रुग्णालयात दाखल केले असून तिच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरु आहे” असे वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याने सांगितले.
“देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ निवासस्थानी तैनात असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचा करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे” महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
“१२ एप्रिलला त्याच्यामध्ये करोनाची लक्षणे आढळून आली. १४ एप्रिलला त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचा करोनाचा चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. सागरवर तैनात असलेल्या सर्व पोलिसांना क्वारंटाइनमध्ये राहण्यास सांगण्यात आले आहे” अशी माहिती महापालिका अधिकाऱ्याने दिली.
0 comments:
Post a Comment
Please add comment