Today Rashi Bhavishya - 30 April 2020


मेष : हितशत्रुंचा त्रास होईल. मित्र दगा देतील. पदरमोड करावी लागणारच.

वृषभ : एकाकी झुंज द्यावी लागेल. शेरेबाजी सहन करावी लागेल. तब्येतीच्या तक्रारी डोके वर काढतील.

मिथुन : नातेसंबंधांत स्नेह निर्माण होईल. संपर्क कायम ठेवा. झपाट्याने कामे होतील.

कर्क : शारीरिक ताण टाळा. औषधांवर खर्च होईल. अवाजवी कामे टाळा.

सिंह : बुद्धिमत्ता प्रगल्भ होणे गरजेचे. धोरणी निर्णय यश देतील. घरगुती कामे वेगाने पूर्ण करा.

कन्या : एकटे वाटेल. निराशा टाळावी. गृहित धरणे टाळायला हवे.

तुळ : प्रियजनांचा सहवास राहील. निर्णयाबाबत गुप्तता राखा. चपळाईने कामे उरकावी लागतील.

वृश्चिक : स्वार्थ आणि परमार्थ साधेल. वैचारिक अनुकूलतेवर काम करा. मध्यम स्वरूपाचा दिवस.

धनु : सर्व कामात अडचणी येण्याची शक्यता. धाडस दाखवा. एकलकोंडेपणा टाळावा.

मकर : चालढकलपणा नको. सेवा क्षेत्रातील लोकांना वेगळ्या संधी. वादग्रस्त मुद्द्यांवर चर्चा करू नका.

कुंभ : दिशा पक्की होईल. कार्यशैली सुधारेल. भावनिक अस्थिरतेवर मात कराल.

मीन : जोडीदाराच्या तब्येतीची काळजी वाटेल. वैद्यकीय मदत अथवा सल्ला अवश्य घ्या. नामस्मरण केल्याने प्रसन्न वाटेल.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment