आजचे राशीभविष्य, बुधवार, २९ एप्रिल २०२०मेष:-स्मरण शक्तीला ताण द्यावा लागेल. फार हटवादीपणा करू नका. आपले मत उत्तमरित्या मांडाल. टीकेला सामोरे जाऊ लागू शकते. कलेला पोषक वातावरण लाभू शकते.


वृषभ:-सर्वांशी गोडीगुलाबीने वागाल. आपले योग्य व विचारी मत शांतपणे मांडाल. प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्याल. नवीन मित्र जोडले जातील. तुमच्या व्यक्तिमत्वाची छाप पडेल.
मिथुन:-दिवस आपल्या मर्जीप्रमाणे व्यतीत कराल. चार चौघांत तुमच्या शब्दाला मान मिळेल. व्यवसायात वाढ करता येईल. व्यापार्‍यांना चांगला आर्थिक लाभ होईल. बढतीसाठी प्रयत्न करावेत.
कर्क:-तुमच्या स्वभावावर खुश होतील. मोठ्या लोकांच्या ओळखीचा फायदा होईल. आर्थिक मिळकत सुधारेल. मनाची चंचलता जाणवेल. जोडीदाराचे मत ग्राह्य मानावे लागेल.
सिंह:-उष्णतेच्या तक्रारी जाणवतील. चहाडखोर व्यक्तींपासून दूर राहावे. खाण्या पिण्याचे पथ्य पाळावे. अधिक उर्जेने कामे कराल. मनातील इच्छा पूर्ण होईल.
कन्या:-मुलांची काळजी लागून राहील. स्त्रियांनी आरोग्याची काळजी घ्यावी. सट्टा जुगारा पासून दूर राहावे. उपासनेला अधिक वेळ देता येईल. पारमार्थिक मदत कराल.
तूळ:-जोडीदाराचा सुस्वभावीपणा दिसून येईल. भागीदारीत तुमचे वर्चस्व राहील. नातेवाईकांचा गैरसमज दूर करावा लागेल. घरगुती प्रश्न चर्चेने हाताळा. दिवसभर कार्यरत राहाल.
वृश्चिक:-कानाच्या विकारांची काळजी घ्यावी. योग्य चलाखी दाखवून कामे कराल. भावंडांची मतभेद संभवतात. प्रतिकूलतेतून मार्ग काढता येईल. वाहन चालवताना काळजी घ्यावी.
धनू:-लहरीपणाने वागू नये. बोलताना सारासार विचार करावा. वस्तूंची उपयुक्तता लक्षात घेऊन खर्च करावा. कामातील तांत्रिक ज्ञान गोळा करावे. कष्टाला घाबरू नका.
मकर:-डोकेदुखीचा त्रास जाणवेल. अधिकाराचा उत्तम वापर करता येईल. मागचा पुढचा विचार करून निर्णय घ्यावेत. कामाच्या ठिकाणी अनपेक्षित बदल दिसून येतील. आपलेच म्हणणे खरे कराल.
कुंभ:-दूरच्या प्रवासाचे योग येतील. अनाठायी खर्च होण्याची शक्यता आहे. सौंदर्य प्रसाधने खरेदी केली जातील. मुलांच्या आनंदात रमून जाल. गैरसमजुतीतून वाद वाढू शकतो.
मीन:-मित्रांशी होणारे गैरसमज टाळावेत. आर्थिक व्यवहार विचारपूर्वक कराल. घरगुती कामात अधिक वेळ जाईल. एककल्ली विचार करू नका. बोलण्यातून तुमचे चातुर्य दाखवाल.

About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment