![]() |
तबलिगी जमातचे प्रमुख मौलाना सादसह इतरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा |
तबलिगी जमातचे प्रमुख मौलाना साद यांच्यासह इतर काही जणांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दिल्लीसह संपूर्ण भारतात करोनाचं संकट वाढलं ते तबलिगी जमातच्या निजामुद्दीनमध्ये झालेल्या उत्सवामुळे. यामुळेच दिल्ली पोलिसांनी तबलिगी जमातचे प्रमुख मौलाना मोहम्मद साद यांच्यासह इतर काही जणांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला आहे. एवढंच नाही तर पोलिसांनी व्हिसाच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या १९०० जणांना लुकआउट नोटीसही जारी केली आहे.
दिल्ली पोलिसांनी मौलाना साद यांच्यासह एकूण १७ जणांनी तपासणीसाठी समोर यावं म्हणून नोटीस बजावली आहे. यापैकी ११ जणांनी होम क्वारंटाइन असल्याची सबब दिली आहे.आजतकने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.मौलाना साद यांनीही आपण क्वारंटाइन आहोत असं सांगितलं होतं. आता त्यांचा आयोसोलेशनचा कालावधी संपला की पोलीस त्यांना अटकही करु शकतात.
दिल्लीतील निजामुद्दीन या ठिकाणी झालेल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमात देशभरातून अनेक लोक गेले होते. त्यानंतर या सगळ्यांचं करोना कनेक्शनही समोर आलं. सुरुवातीला महामारी पसरवण्याचा गुन्हा आणि इतर गुन्हे नोंदवून तक्रारी केल्या गेल्या. आता या प्रकरणी मौलाना साद यांच्यासह काही जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हाही नोंदवण्यात आला आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment