अत्यावश्यक सेवांना आजपासून सूट

अत्यावश्यक सेवांना आजपासून  सूट
सोमवारपासून राज्य सरकारच्या निर्देशानुसार अत्यावश्यक सेवांना काही अटीसापेक्ष टाळेबंदीतून सवलत मिळणार आहे. यामध्ये कोणत्या क्षेत्रांना ही शिथिलता दिली जाईल त्याबाबतची नियमावली पालिकेने जाहीर केली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला जाणार असून एक वर्षांपर्यंत कैद देखील होऊ शकते, असे या नियमावलीत म्हटले आहे.
‘कोरोना कोविड १९’ या संसर्गजन्य आजारास प्रतिबंध करण्याकरीता संपूर्ण देशभरात दिनांक ३ मे पर्यंत टाळेबंदी करण्यात आली आहे. मात्र केंद्र सरकारद्वारे देण्यात आलेल्या सुधारित निर्देशानुसार दिनांक २० एप्रिलपासून नागरिकांच्या गरजांचा विचार करून काही अत्यावश्यक व गरजेच्या सेवांसाठी सूट देण्यात आली आहे.
अटी
* अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींनी प्रवास करताना चारचाकी वाहन असल्यास यातून चालकाव्यतिरिक्त एका व्यक्तीस प्रवास करण्याची परवानगी, तर दुचाकी वाहनावरून केवळ एकाच व्यक्तीस प्रवास करण्याची परवानगी. बस असल्यास त्यातून बसच्या एकूण क्षमतेच्या ३० टक्के क्षमतेने प्रवास करण्यास परवानगी.
* सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एका ठिकाणी जमण्यास मनाई. पाच व्यक्तींपर्यंत देखील सोशल डिस्टन्सींग पाळणे बंधनकारक.
* विवाह वा तत्सम समारंभ हे परवानगीनेच मर्यादित स्वरूपात आयोजित करता येणार
* सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हा गुन्हा
* गुटखा तंबाखू इत्यादी बाबींच्या विक्रीवर पूर्णपणे प्रतिबंध
* काम करण्याच्या ठिकाणी, कार्यालयांमध्ये सोशल डिस्टन्सींग पाळणे बंधनकारक. त्याचबरोबर मास्क, सॅनिटायझर त्यांचा वापर करणे देखील बंधनकारक.
* कार्यालय किंवा औद्योगिक आस्थापना इत्यादी ठिकाणी असणाऱ्या लिफ्ट, प्रसाधनगृहे, कॅन्टीन, प्रवेश द्वार, पिण्याच्या पाण्याची ठिकाणे निर्जंतुक करणे आवश्यक
* ज्या ठिकाणी शिफ्टमध्ये काम चालते, त्याठिकाणी दोन शिफ्टमध्ये किमान एक तासाचे अंतर आवश्यक
* लिफ्टमधून एकावेळी दोन ते चार व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्तींना प्रवास करण्याची अनुमती नाही. तसेच, जिन्याचा वापर करण्यास कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करावे.
* संसर्गजन्य आजार प्रतिबंधाच्या अनुषंगाने दिलेल्या सूचनांचे परिपूर्ण पालन न केल्याचे आढळून आल्यास किंवा खोटी माहिती दिल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित कंपनी, औद्योगिक संस्था, भागीदारी संस्था, व्यवसायिक संस्था इत्यादींचे संचालक / मालक / सचिव / संबंधित अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल होणार
* संसर्गजन्य आजाराच्या प्रतिबंध कार्यवाहीमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या किंवा तसा प्रयत्न करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होऊन कारवाई होणार. २ वर्षांंपर्यंत कैदेच्या शिक्षेची तरतूद
यांना सूट
* रुग्णालये, दवाखाने, औषधांची दुकाने, वैद्यकीय प्रयोगशाळा, वैद्यकीय संशोधन, औषध उपचार विषयक विक्री व पुरवठा करणारी दुकाने, पशुवैद्यकीय दवाखाने-रुग्णालय-औषध विक्री ठिकाणे, रुग्णवाहिका व रुग्णवाहिकेशी संबंधित बाबी, औषध गोळ्या निर्मितीशी संबंधित बाबी, मत्स्योत्पादन, रुग्णालय वा वैद्यकीय पायाभूत सुविधांशी संबंधित बांधकाम इत्यादी बाबींचा समावेश आहे.
* महापालिकेद्वारे देण्यात येणाऱ्या बाबींशी संबंधित खाती व तेथील संबंधित कर्मचारीवर्ग,
* बँक, सेबी, इन्शुरन्स
* वृद्धाश्रम, महिला आश्रम, बालकाश्रम, अनाथ आश्रम, निरीक्षण गृह इत्यादींचे दैनंदिन कामकाज चालू राहण्यासाठी आवश्यक त्या सर्वबाबी*पेट्रोल, डिझेल, गॅस, रॉकेल, एलपीजी, सीएनजी, पीएनजी इत्यादी इंधन विषयक बाबींशी संबंधित
* दैनंदिन गरजांच्या अनुषंगाने आवश्यक त्या वस्तूंची मालवाहतूक
* प्रसारमाध्यम, केबल सर्विसेस, डायरेक्ट टू होम, डेटा व कॉल सेंटर इत्यादींशी संबंधित बाबी. हे कमीत कमी कर्मचाऱ्यांच्या मदतीने चालवणे अपेक्षित.
* किराणा दुकान, भाजीविक्रेते, दूध विक्रेते,  रेशन दुकान इत्यादी.
* ई-कॉमर्स विषयक बाबी
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment