![]() |
गरिबांच्या मदतीसाठी 65 हजार कोटींची गरज, राहुल गांधींसोबतच्या चर्चेत रघुराम राजन यांचं मत |
कोरोना व्हायरसमुळे मागील एक महिन्यापासून देशभरात लॉकडाऊन आहे. देशातील सर्व व्यवहार ठप्प आहेत. लोक घरातच आहेत. कारखान्यांना टाळं लागलेलं आहे. याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर दिसत आहे. जीपीडीचा वेग पूर्णत: थांबला आहे. अर्थव्यवस्थेसमोरील या आव्हानांबाबत राहुल गांधी यांनी आज (30 एप्रिल) आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्याशी चर्चा केली. "सध्याच्या घडीला गरिबांना मदत करणं आवश्यक आहे, ज्यासाठी सरकारला सुमारे 65 हजार कोटी रुपये खर्च करावे लागतील," असं रघुराम राजन म्हणाले.
कोरोना व्हायरसचा भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणामासंदर्भात काँग्रेसने नवी आजपासून (30 एप्रिल) नवी मोहीम सुरु केली. याअंतर्गत खासदार राहुल गांधी जगभरातील तज्ज्ञांशी चर्चा करणार आहेत, संवाद साधणार आहेत. राहुल गांधी या संवादाची सुरुवात रिझर्व बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांच्यापासून केली. अर्थव्यवस्था, रोजगार, कोरोना संकटानंतर कशाप्रकारे सावरता येईल आणि सरकारला कोणती पावलं उचलावी लागतील या मुद्द्यांवर चर्चा झाली.
डॉ. रघुराम राजन 2013 पासून 2016 पर्यंत रिझर्व बँकचे गव्हर्नर होते. अनेक वेळा त्यांनी मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीकाही करताना दिसले.
गरिबांना 65 हजार कोटी रुपयांची मदत मिळणं आवश्यक : रघुराम राजन
रघुराम राजन यांनी राहुल गांधी यांच्या एका प्रश्नावर उत्तर दिलं की, "देशातील गरीब, मजूर आणि शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत करावी लागेल, ज्यासाठी 65 हजार कोटी रुपये खर्च करावे लागतील. गरिबांना 65 हजार कोटी रुपये देण्याची गरज आहे."
रघुराम राजन यांनी राहुल गांधी यांच्या एका प्रश्नावर उत्तर दिलं की, "देशातील गरीब, मजूर आणि शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत करावी लागेल, ज्यासाठी 65 हजार कोटी रुपये खर्च करावे लागतील. गरिबांना 65 हजार कोटी रुपये देण्याची गरज आहे."
0 comments:
Post a Comment
Please add comment