![]() |
कोरोनाचा अंधार दूर करण्यासाठी मोदींचे देशवासियांना संदेश |
लॉकडाऊन ला आज ९ दिवस पूर्ण झाले. या काळात सगळ्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांना धन्यवाद. आज जग भरातील अनेक देश याचं अनुकरण करतायत.
देशाने देशभावना दाखवली. आपण एक होऊन कोरोना शी लढू शकतो हे आपण दाखवून दिलं.
आपण विचार करत असाल की, इतकी मोठी लढाई एकट्याने कसं लढणार? पण मित्रांनो आपण जरूर आपापल्या घरात आहात, मात्र १३० कोटी लोकसंख्येची सामुहीक शक्ती एकत्र आहे.
जनता जनार्दन इश्वराचं रूप असते असं आपल्या इथे मानलं जातं. आपण या विराट शक्तीचं वारंवार दर्शन केलं पाहिजे. इथूनच आपल्याला उर्जा मिळते.
आपल्या गरीब भाऊ-बहिणींना कोरोना मुळे झालेल्या त्रासातून आपल्याला बाहर काढायचं आहे. या सगळ्या लोकांना अंध:कारातून बाहेर काढायचं आहे.
या पाच एप्रिल ला १३० कोटी लोकांच्या महाशक्ती आणि महासंकल्पचं दर्शन घडवायचं आहे.
पाच एप्रिल ला रात्री ९ वाजता घराचे सर्व दिवे बंद करून ९ मिनिटे मेणबत्ती, टॉर्च, मोबाईल ची फ्लॅशलाइट किंवा दिवे लावा.
घरातले सर्व दिवे करून जर हा प्रकाशपर्व आपण साजरा करू शकलो. तर आपण सा संकल्प दाखवू शकतो की आपण एकटे नाहीयत.
या वेळी बाहेर पडू नका, सोशल डिस्टंसिंग पाळा, कोरोनाची चैन तोडायचा हाच रामबाण उपाय आहे. ५ तारखेला ९ वाजता थोडा वेळ बसून भारतमातेचं स्मरण करा.
0 comments:
Post a Comment
Please add comment