![]() |
“मुल्ला मौलवी आहेत कुठे ?” - राज ठाकरे |
मुस्लीम समाजातील अनेकांची दिशाभूल केली जात असल्याच्या प्रश्नावर बोलताना राज ठाकरे यांनी यांचे मुल्ला मौलवी आहेत कुठे ? असा सवाल विचारला. निवडणुकीच्या वेळी येतात ना कुणाला मतदान करावं सांगायला, मग आता या मुल्ला मौलवींनी समोर येऊन कसं वागायला हवं ते सांगायला हवं. पण ते आता कुठे आहेत ? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. संशय येणारी स्थिती हे का निर्माण करतात असं विचारत कारलं तुपात घोळवा, साखरेत घोळवा कडू ते कडूच राहतं, तसंच आहेत हे अशी टिप्पणीही त्यांनी मुस्लीम धार्मिक गुरूंवर केली.
लॉकडाउनची शिस्त पाळली जाणार नाही तर अर्थसंकट निर्माण होईल अशी भीती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. लॉकडाउनची शिस्त पाळा अशी माझी विनंती आहे. यंत्रणेवर ताण आला तर सरकारवर होईल. त्यामुळे उद्योगधंद्यावर परिणाम होईल, नोकऱ्या जातील. हे सगळं आपल्या एका चुकीमुळे होणार आहे असं राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.
0 comments:
Post a Comment
Please add comment