![]() |
महाराष्ट्रात MCA CET 2020 परीक्षा स्थगित |
करोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेलं लॉकडाउन आता ३ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेण्यात येणारी अभिायांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा (एमएचटी-सीईटी) पुढे ढकलण्यात आली आहे. सद्य स्थितीची समिक्षा करण्यात येणार असून नव्या तारखांची घोषणा अधिकृत संकेतस्थळावर करण्यात येणार आहे.
यापूर्वी लॉकडाउन जाहीर करण्यात आल्यामुळे सीईटीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. राज्यात १३ एप्रिल ते २३ एप्रिल या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने सीईटी होणार होती. परंतु लॉकडाउनचा कालावधी वाढवल्यानं ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. त्याचप्रमाणे राष्ट्रीय परीक्षा कक्षानेही ५ एप्रिल ते ११ एप्रिल दरम्यान होणारी जेईई पुढे ढकलण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला होता.
सीईटी कक्षानं या प्रवेश परीक्षांच्या अर्जाची मुदत वाढवली आहे.
MAH B.P.Ed. CET 2020
MAH M.Ed. CET 2020
MAH B.Ed. M.Ed. Integrated Course CET 2020
MAH M.P.Ed. CET 2020
MAH BA/B.Sc. B.Ed. Integrated Course CET 2020
0 comments:
Post a Comment
Please add comment