संकटाच्या काळात भारतानं जगाला आपल्या संस्कृतीचं दर्शन घडवलं - पंतप्रधान नरेंद्र मोदी

संकटाच्या काळात भारतानं जगाला आपल्या संस्कृतीचं दर्शन घडवलं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
करोनामुळे देश ठप्प झाला आहे. करोनाला नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारनं देशात लॉकडाउन लागू केला. लॉकडाउनच्या काळात सर्वच यंत्रणा युद्ध पातळीवर लढत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधला. भारतीय जनता देत असलेल्या लढ्याला पंतप्रधान मोदी यांनी सलाम केला. “संकटाच्या काळात भारतानं जगाला आपल्या संस्कृतीचं दर्शन घडवलं. त्यामुळेच आज भारताचे आभार मानले जात आहे,” असं मोदी म्हणाले.
‘मन की बात’च्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधताना मोदी म्हणाले,”संपूर्ण जग करोनाविरोधात एकवटलं आहे. जेव्हा भविष्यात याची चर्चा होईल, तेव्हा भारतातील जनतेनं याविरोधात कसा लढा दिला, याची दखल घेतली जाईल. लॉकडाउनच्या काळात देश कसा एकजूट झाला. लॉकडाउनच्या काळात प्रत्येकजण आपापल्या परीनं लढत आहे. सफाई कर्मचाऱ्यांपासून ते पोलिसांपर्यत सगळ्यांचा जनतेच्या मनातील आदर वाढला आहे. करोनाच्या काळात सगळेचं झोकून देऊन काम करत आहेत. त्यामुळेच स्वच्छता ठेवणाऱ्यांवर नागरिकांकडून पुष्पवृष्टी होताना दिसत आहे. कुणी घरभाडं माफ करतोय, कुणी किराणा देतोय. शेतकरी शेतात रात्रंदिवस मेहनत करून देशात कुणीही उपाशी झोपणार नाही, याची काळजी घेत आहे. कुणी पेन्शन देतंय, कुणी शेकडो गरिबांना मोफत जेवण देत आहे. दुसऱ्यांच्या मदतीसाठी तुमच्या मनात असलेला भाव या लढाईला बळ देत आहे. स्वच्छ भारत अभियानापासून ते गॅस सबसिडी सोडण्यापर्यंत तुमच्या ही भावना दिसून आली. देशवासीयांच्या या भावनेला मी नमन करतो,” असं म्हणत मोदी यांनी सामाजिक कार्यात पुढे आलेल्यांचे आभार मानले.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment