![]() |
लॉकडाउन नंतर घरी पोहोचण्यासाठी अशी लढवली शक्कल |
करोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या देभरात 3 मे पर्यंत लॉकडाउनची घोषणा करण्यात आलेली आहे. अशावेळी आपलं घर, शहर सोडून अन्य ठिकाणी अडकलेल्यांची घरी जाण्यासाठी धडपड सुरू आहे. यासाठी अनेकजण विविध मार्गांचा अवलंब करत आहेत. अशाचप्रकारे मुंबईतून अलहाबादला जाण्यासाठी लॉकडाउमध्ये अडकलेल्या एकाने चक्क 25 टन कांदा खरेदी केला व तो ट्रकमध्ये भरून रस्ते मार्गाने हा व्यक्ती थेट आपल्या गावी पोहचला. लॉकडाउनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरू असल्याचा त्याने फायदा घेतल्याचे दिसून आले.
प्रेममुर्ती पांडे असे नाव असलेला हा व्यक्ती मुंबई विमानतळावर कामाला आहे. आपल्या मुळ गावी जाण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती. करोनाचा भारतात शिरकाव झाल्यानंतर लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनचा पहिला टप्पा त्याने मुंबईतच काढला. मात्र नंतर पुन्हा लॉकडाउन वाढवण्यात आल्याने हा मार्ग पत्कारला असल्याची माहिती त्यांनी पीटीआयशी बोलताना दिली.
प्रेममुर्ती पांडे म्हणाले, अंधेरी पूर्वमधील आझाद नगरमध्ये मी जिथे राहत होतो तो भाग करोना प्रादुर्भावाच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक होता. तर, करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बस, रेल्वे व विमानसेवा थांबण्यात आलेली होती. या परिस्थिती मला दिसून आले की, सरकारने एक मार्ग खुला ठेवला आहे. तो म्हणजे अत्यावश्यक सेवा म्हणून फळ व भाज्या आदींच्या वाहतुकीला शिथिलता देण्यात आलेली आहे.
हे पाहून सर्वप्रथम तब्बल 1 हजार 300 किलो टरबुज खरेदी केले. 17 एप्रिल रोजी किमान 200 किलोमीटर दूर असलेल्या नाशिकजवळील पिंपळगाव येथे जाण्यासाठी एक मिनी ट्रक भाड्याने घेतला. नंतर जवळपास दहा हजार रुपयांचे टरबुज खरेदी केले व वाहन मालासह परत मुंबईला पाठवले. अगोदरच मुंबईतील खरेदीदाराशी याबाबत व्यवहार झालेला होता. त्यानंतर पिंपळगावमधील उत्तम दर्जाच्या कांदा बाजाराचा अभ्यास केला व दोन लाख 32 हजार रुपयांमध्ये 25 हजार 520 किलो चांगल्या दर्जाचा कांदा खरेदी केला. जो की 9 रुपये 10 पैसे प्रतिकिलो पडला. त्यानंतर 77 हजार 500 रुपये भाडे ठरवून पुन्हा एक ट्रक घेतला. 1 हजार 200 किलोमीटर दूर असलेल्या अलहाबादला जाण्यासाठी 20 एप्रिल रोजी हा कांदा ट्रकमध्ये भरला.
यानंतर जेव्हा ते 23 एप्रिल रोजी अलहाबादला पोहचले तेव्हा त्यांनी मालाची विक्री करण्यासाठी थेट शहरातील मुंडेरा ही ठोक बाजारपेठ गाठली. मात्र त्यांना मालाची रोख खरेदी करण्यासाठी कोणीच ग्राहक मिळाला नाही. त्यामुळे पांडे यांनी ट्रक तेथून काही किलोमीटर दूर असलेल्या कोटवा मुबारकपूर या आपल्या गावी नेला व त्या ठिकाणी हा माल उतरवण्यात आला.
0 comments:
Post a Comment
Please add comment