इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी

Actor Irrfan Khan dies in Mumbai - Janta Ka Reporter 2.0
इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी

बॉलिवूड अभिनेता इरफान खान यांचं वयाच्या ५४ व्या वर्षी निधन झालं. मंगळवारी कोलन इन्फेक्शनमुळे त्यांना इस्पितळात भरती करण्यात आलं होतं. यादरम्यान त्यांच्या आरोग्याविषयीच्या अनेक अफवा पसरत होत्या. मात्र इरफान यांच्या टीमने ते लढवय्ये असून लवकर बरे होतील अशी आशा व्यक्त केली होती. मात्र बुधवारी दिग्दर्शक शूजित सरकारने इरफान यांच्या निधनाचं ट्वीट करत खान कुटुंबियांचं सांत्वन केलं.

शूजीत यांनी ट्वीटमध्ये लिहिले की, 'इरफान माझ्या मित्रा.. तू लढलास आणि लढलास आणि लढलास.. मला तुझा नेहमीच अभिमान वाटेल. आपण पुन्हा भेटू. सुतापा आणि बाबिल तुम्हीही लढलात. सुतापा या लढाईत तुला जे शक्य होतं ते तू केलंस. ओम शांती. इरफान खानला सलाम.'

दोन दिवसांपूर्वी त्याची आई सईदा बेगम यांचं निधन झालं. लॉकडाउनमुळे इरफान आईला शेवटचं पाहायलाही जाऊ शकला नाही. आईचं अंत्यदर्शनही त्याला व्हिडिओ कॉलद्वारे घ्यावं लागलं होतं. आईला शेवटचं पाहता आलं नाही ही सल त्याच्या मनात होती.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment