![]() |
अमेरिका, स्पेन आणि युनायटेड किंगडम या देशांना भारताने सर्वप्रथम हायड्रोक्सीक्लोरोक्वीन या औषधाचा पुरवठा |
करोना व्हायरसमुळे सर्वाधिक बेजार झालेल्या अमेरिका, स्पेन आणि युनायटेड किंगडम या देशांना भारताने सर्वप्रथम हायड्रोक्सीक्लोरोक्वीन या औषधाचा पुरवठा केला. त्यानंतर भारत आता रशिया, संयुक्त अरब अमिराती, जॉर्डन, लॅटिन अमेरिका आणि आफ्रिकेतील देशांना HCQ, पॅरासीटेमॉल या औषधांचा पुरवठा करणार आहे. रशिया आणि संयुक्त अरब अमिराती हे भारताचे सर्वात जवळचे मित्र आणि रणनितीक भागीदार असलेले देश आहेत.
युगांडा, इक्वाडोर या देशांनाही HCQ औषधांचा पुरवठा करण्यात येणार आहे. रशियाला दोन औषधांचा पुरवठा करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये २५ मार्च रोजी चर्चा झाली अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.
आखाती देशांवर विशेषकरुन संयुक्त अरब अमिरातीवर भारताचे विशेष लक्ष आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि परराष्ट्र सचिव हर्ष श्रिंगला हे आखाती देशांच्या संपर्कामध्ये आहेत. बहरीनला सुद्धा HCQ च्या गोळया पाठवण्यात आल्या आहेत. हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हे औषध करोना व्हायरसवर सर्वाधिक प्रभावी ठरत असल्याने जगभरातून या औषधाला मोठया प्रमाणावर मागणी आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment