![]() |
अमेरिकेत बाहेरील नागरिकांना दोन महिने 'नो एन्ट्री': ट्रम्प |
अमेरिकेत पुढील दोन महिने परदेशी व्यक्तींना प्रवेशबंदी करण्याचा आदेश अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी जारी केला. याबाबतच्या आदेशावर त्यांनी स्वाक्षरी केली आहे. अमेरिकी नागरिकांचा रोजगार वाचविण्यासाठी हा निर्णय घेतल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे.
सध्या अमेरिकेत नोकरीच्या निमित्ताने येऊ पाहणाऱ्या सर्वांना हा निर्णय लागू असेल; तसेच आदेश लागू झाल्यादिवशी ज्यांच्याकडे वैध मुदतीचा व्हिसा नसेल, त्यांनाही हा मनाई आदेश लागू असेल. मात्र, सध्या अमेरिकेत राहणाऱ्या परदेशी व्यक्तींना हा निर्णय लागू होणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
'हा अतिशय प्रभावी निर्णय आहे,' असे सांगून दैनंदिन पत्रकार परिषदेत ट्रम्प म्हणाले, 'अमेरिकेतील व्यवहार सुरळीत झाल्यानंतर सर्वप्रथम अमेरिकी नागरिकांनाच तेथे संधी मिळावी, यासाठी स्थलांतर थांबविण्यात आले आहे. करोनामुळे ले ऑफ मिळालेल्या अमेरिकी कामगारांची जागा स्थलांतरित परदेशी कामगारांनी घेतल्यास ते अन्याय्य ठरेल. हा निर्णय न घेतल्यास अमेरिकेची अर्थव्यवस्था रूळावर येणे शक्य नाही, अशी माझी खात्री आहे.'
0 comments:
Post a Comment
Please add comment