![]() |
दिल्लीत धोका : १७० आरोग्य कर्मचारी करोनाच्या जाळ्यात |
करोनाच्या संकटकाळात राजधानी दिल्लीला जोरदार धक्का बसलाय. या संकटकाळात 'करोना योद्धे' बनून शत्रूशी दोन हात करणाऱ्या डॉक्टर आणि मेडिकल स्टाफचं करोना चक्रव्युहात अडकल्याचं समोर आलंय. केवळ दिल्लीत डॉक्टर, नर्ससहीत जवळपास १७० जणांचा मेडिकल स्टाफ करोनाच्या जाळ्यात ओढला गेलाय.
सर्वात जास्त करोनाबाधित दिल्लीच्या पटपडगंज स्थित मॅक्स रुग्णालयात आढळले आहेत. इथं ३३ आरोग्यविभागाचे कर्मचारी करोना संक्रमित असल्याचं समोर आलंय. हा स्टाफ इतर संक्रमित व्यक्तींवर उपचार करून त्यांची देखरेख करत होता. यामध्ये २ डॉक्टर आणि २३ नर्सेससही काही टेक्निशिअन आणि सपोर्ट स्टाफचा समावेश आहे. या सर्वांना 'कोविड'साठी नेमण्यात आलेल्या साकेत स्थित मॅक्स रुग्णालयात हलवण्यात आलंय.
0 comments:
Post a Comment
Please add comment