भारतामध्ये करोनाबाधितांची संख्या १२ हजारांच्या पुढे

भारतामध्ये करोनाबाधितांची संख्या १२ हजारांच्या पुढे
करोना व्हायरस महामारीमुळे भारतामध्ये आतापर्यंत ४१४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर करोना बाधितांची संख्या १२, ३८० झाली आहे. गेल्या २४ तासांमध्ये भारतामध्ये ३७ जणांचा मृत्यू झाल्यामुळे भारतामध्ये चिंतेचे वातावरण आहे. यापैकी १४८९ रुग्णांना घरी पाठवण्यात आलं आहे. तर १० हजार ४४७ रुग्णांवर उपचार सुरु आहे. देशभरात लॉकडाउनचा कालावधी ३ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच ही घोषणा केली. लॉकडाउनचे नियम आणखी कठोर होणार असल्याचंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं. भारतामध्ये १२३ जिल्ह्यात १७० करोना व्हायरसचे हॉटस्पॉट आहेत. दिल्ली-मुंबईमध्ये सर्वाधित चिंतेचे वातावरण आहे.
मुंबई, कोलकाता, बेंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, जयपूर आणि आग्रासारख्या प्रमुख शहरात करोना व्हायरसचे हॉटस्पॉट आहेत. या शहरामध्ये करोनाबाधिंताची संख्या जास्त आहे. या सर्व भागांना रेड झोन म्हणून घोषीत करण्यात आले असून येथे १०० टक्के लॉकटाउन पाळण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून या प्रमुख शहरामध्ये करोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. ज्या ठिकाणी करोनाचा शिरकाव झालेला नाही तिथे काही गोष्टी शिथील केल्या जातील मात्र लॉकडाउन कायम असेल असंही आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे
भारतातील ४०० जिल्ह्यांमध्ये करोना व्हायरसचा प्रादुर्भाव झालेला नाही. या जिल्ह्यामध्ये एकही करोनाबाधित रूग्ण आढळलेला नाही. त्यामुळे सरकार या जिल्ह्यांना करोनामुक्त कायम ठेवण्यासाठी सर्वोत्परी प्रयत्न करत आहे. तर ज्या जिल्ह्यांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव झाला आहे त्यांचा तपास करण्यात आम्हाला यश आलं आहे. तसंच पुढचे २-३ आठवडे हे देशासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत, असं केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सांगितलं.
दरम्यान, जगभरात करोनाची २० लाख १५ हजार ५७१ जणांना लागण झाली असून आतापर्यंत एक लाख २७ हजार ६३५ जणांचा मृत्यू झाला आहे. केवळ युरोपमध्ये १० लाख तीन हजार २८४ जणांना लागण झाली असून ८४ हजार ४६५ जणांचा मृत्यू झाला आहे.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment