![]() |
CoronaUpdate:Google ने तयार केलं स्पेशल Doodle, सांगितले कोरोनापासून बचावासाठी खास उपाय |
कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी सरकार लोकांना घरीच राहण्याचं आवाहन करत आहे. त्याचसोबत कोविड-19 पासून बचाव करण्यासाठी आवश्यक टिप्सही दिल्या जात आहेत. कोरोना व्हायरस महामारीपासून बचाव करण्यासाठी गुगलनेही पुढाकार घेतला आहे. गुगलने कोरोनाविरूद्ध लढा देणाऱ्या कोरोना वॉरियर्ससाठी गुगल डुडलची एक खास सीरिज तयार केली आहे. ज्यातून गुगलने कोरोना वॉरियर्सचा सन्मान केला आहे.
गुगलने आजही एक खास डुडल तयार केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी पुन्हा एकदा लोकांना कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी आवश्यक टिप्स सांगितल्या आहेत. गुगलने आपल्या नावातील एक-एक लेटर घेऊन खास संदेश दिला आहे.
गुगलच्या या डुडलमध्ये G शब्द पुस्टक वाचत आहे, O शब्द गाणं गात आहे आणि दुसरा O शब्द गिटार वाजवत आहे. याव्यतिरिक्त G शब्द फोनमध्ये व्यस्त आहे. L घरात वर्कआउट करत आहे. तर E फोनवर गप्पा मारत आहे. गुगले या डुडलमार्फत सर्वांना घरीच राहण्याचं आवाहन केलं आहे.
गुगलने या डुडलवर क्लिक केल्यानंतर या सर्व टिप्स हिंदीमध्ये सांगण्यात आल्या आहेत. ज्यांमध्ये लिहिलं आहे, घरीच राहा, सुरक्षित अंतर ठेवा. हात सतत धुवा, खोकताना किंवा शिंकताना तोंडावर हात ठेवा. आजारी आहात? लगेच हेल्पलाइन नंबरवर कॉल करा. याआधीही गुगलने कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी आवश्यक टिप्स दिल्या
0 comments:
Post a Comment
Please add comment